मुंबई - नवविवाहित जोडपे कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांनी त्यांचा विवाहापूर्वीचा रोमान्स लपवला होता. परंतु हे दोघे फरहान अख्तरच्या आगामी दिग्दर्शित ''जी ले जरा'' या चित्रपटामध्ये रोमान्स करताना दिसतील. कॅटरिनासोबत भूमिका साकारण्यासाठी निर्मात्यांनी विकीला संपर्क साधल्याच्या वृत्तामुळे 'विकॅट'चे चाहते आधीच उत्साहित झाले आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
कॅटरिना, प्रियांका चोप्रा आणि आलिया भट्ट यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात पुरुष लीड शोधण्यात चित्रपटाच्या निर्मात्यांना बरेच कष्ट घ्यावे लागत आहेत. विकी आणि कॅटरिनाच्या लग्नाची झालेली चर्चा पाहून, निर्मात्यांनी कॅटरिनाच्या विरुद्ध भूमिका साकारण्यासाठी विकी कौशलची निवड करण्याचा विचार केला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
विकीने सहमती दर्शवल्यास, ''जी ले जरा'' हा पहिला चित्रपट असेल ज्यामध्ये तो पत्नी कॅटरिनासोबत असेल. अभिनेता-दिग्दर्शक म्हणून फरहान आणि त्याची बहीण झोया अख्तर आणि तिची जोडीदार रीमा कागती निर्मात्याच्या भूमिकेत असलेल्या या चित्रपटसाठी विकी कौशल हे एक अतिरिक्त आकर्षण असेल. सर्व काही सुरळीत पार पडले तर ''जी ले जरा'' चे मार्केटिंग करणे सोपे होईल कारण हा, विकी आणि कॅटरिनाचा हा पहिलाच चित्रपट असेल.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हा चित्रपट फरहानच्या 'दिल चाहता है' आणि 'जिंदगी ना मिलेगी दोबारा' या रोड ट्रिप चित्रपटांच्या धर्तीवर आधारित असेल. झोया, फरहान आणि रीमा यांनी लिहिलेला, ''जी ले जरा'' २०२३ मध्ये प्रदर्शित होणार आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा - दिया मिर्झाने सांगितला बाळंतपणात मृत्यूच्या जवळ गेल्याचा अनुभव