मुंबई - गेल्या वर्षी कोरोना संसर्गाच्या सुरूवातीपासूनच योगगुरू बाबा रामदेव आपली औषधे आणि योगाच्या जोरावर लोकांना निरोगी बनवल्याचा दावा करत आहेत. इथंपर्यंत ठीक होते, पण रामदेव यांनी अॅलोपॅथीला 'मूर्खांचे विज्ञान' असे वर्णन केल्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीका सुरू झाली आहे. या विधानामुळे कोरोनाविरूद्ध युद्ध लढणार्या डॉक्टरांमध्ये प्रचंड निराशा निर्माण झाली. अलीकडेच बॉलिवूड अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी ट्विट करून बाबा रामदेव यांच्या या विधानाचा चांगलाच समाचार घेतला आहे.
-
Someone should ask this "Businessman" to go to Any #Covid hospital..stand along with our #Doctor n #frontlineworkers just for 24 hours n then do his "terterter".Most inhuman, enraging n disgusting.Whose #Toolkit is he? How dare he?@drharshvardhan @MoHFW_INDIA #BabaRamdev pic.twitter.com/zWIaP25Di1
— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) May 24, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Someone should ask this "Businessman" to go to Any #Covid hospital..stand along with our #Doctor n #frontlineworkers just for 24 hours n then do his "terterter".Most inhuman, enraging n disgusting.Whose #Toolkit is he? How dare he?@drharshvardhan @MoHFW_INDIA #BabaRamdev pic.twitter.com/zWIaP25Di1
— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) May 24, 2021Someone should ask this "Businessman" to go to Any #Covid hospital..stand along with our #Doctor n #frontlineworkers just for 24 hours n then do his "terterter".Most inhuman, enraging n disgusting.Whose #Toolkit is he? How dare he?@drharshvardhan @MoHFW_INDIA #BabaRamdev pic.twitter.com/zWIaP25Di1
— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) May 24, 2021
अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून ट्विट करुन लिहिलं आहे की, 'या बिझनेसमनने कोविड रुग्णालयात जायला हवे, तिथे आमच्या डॉक्टरांसमवेत २४ तास उभे राहावे आणि मग त्यांनी हे विधान करावे. हे सर्वात अमानुष, संतापजनक आणि द्वेषपूर्ण विधान होते. हे कोणाचे टूलकिट आहे? इतकी हिम्मत कशी झाली? उर्मिलाच्या ट्विटवर सातत्याने कमेंट्स येत आहेत. एका वापरकर्त्याने टिप्पणी करताना लिहिले, 'उर्मिला जी तुम्ही बरोबर आहात. हा भोंदू बाबा आहे.'
-
वाह क्या सीन है... https://t.co/U5HKwU1nJb
— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) May 23, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">वाह क्या सीन है... https://t.co/U5HKwU1nJb
— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) May 23, 2021वाह क्या सीन है... https://t.co/U5HKwU1nJb
— Urmila Matondkar (@UrmilaMatondkar) May 23, 2021
योगगुरू बाबा रामदेव यांच्या विधानावर केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन यांनीही रामदेव यांना पत्र लिहून आपले विधान मागे घेण्यास सांगितले आहे.
हेही वाचा - दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या हृदयावर झाली शस्त्रक्रिया!