मुंबई - 'हिरोपंती' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेल्या टायगरने काही काळातच लोकप्रियतेचे शिखर गाठले. आपल्या जबरदस्त अॅक्शन सीनने त्याने प्रेक्षकांची मने जिकंत 'अॅक्शन हिरो' अशी स्वतःची प्रतिमा बनवली. त्याच्या याच अॅक्शनच्या जोरावर टायगरला काही हॉलिवूड सिनेमांच्या ऑफर येत असल्याचे वृत्त आहे.
यावर आता टायगरने आपली प्रतिक्रिया दिली आहे. मला हॉलिवूड चित्रपटांसाठी काही ऑफर आल्या आहेत. मात्र, अद्याप मी कोणताही हॉलिवूड चित्रपट साईन केला नसल्याचे त्याने म्हटले आहे. यासोबतच माझ्या अभिनयाची दखल हॉलिवूडमधूनही घेतली जाते हे ऐकून आनंद झाल्याचे टायगरने म्हटले आहे.
बॉलिवूडमध्ये माझी ओळख केवळ एक अॅक्शन हिरो म्हणून आहे आणि अॅक्शनशिवाय इतर काही भूमिका मी उत्तम पद्धतीने करू शकत नाही. मात्र, तरीही याबद्दल मला दुःख वाटत नसून बॉलिवूडच्या स्पर्धात्मक जगात मी माझी एक वेगळी ओळख निर्माण केल्याचा आनंद असल्याचे त्याने म्हटले आहे.