ETV Bharat / sitara

सलमान खानचा मेव्हणा आयुष शर्माने रिलीज केले 'भाई का बर्थडे'!

author img

By

Published : Nov 2, 2021, 10:55 PM IST

सलमान खानचा मेव्हणा आयुष शर्माने त्याचा आगामी चित्रपट 'अंतिम' मधील 'भाई का बर्थडे' या गाण्याचे जयपूरमध्ये अनावरण केले. निर्मात्यांनी जयपूरच्या राज मंदिर थिएटरमध्ये हे गाणे ‘भाई’ च्या चाहत्यांसोबत रिलीज केले. या चित्रपटातील गँगस्टर असलेल्या आयुष शर्मावर हे गाणे चित्रित करण्यात आले आहे.

सलमान खानचा मेव्हणा आयुष शर्मा
सलमान खानचा मेव्हणा आयुष शर्मा

सलमान खानचा मेव्हणा आयुष शर्माने त्याचा आगामी चित्रपट 'अंतिम' मधील 'भाई का बर्थडे' या गाण्याचे जयपूरमध्ये अनावरण केले. निर्मात्यांनी जयपूरच्या राज मंदिर थिएटरमध्ये हे गाणे ‘भाई’ च्या चाहत्यांसोबत रिलीज केले. या चित्रपटातील गँगस्टर असलेल्या आयुष शर्मावर हे गाणे चित्रित करण्यात आले आहे आणि हा दिवस ज्या टोळीचा आयुष एक भाग आहे त्या म्होरक्याचा वाढदिवस आहे आणि हा दिवस देसी शैलीत आयुषच्या देसी डान्स मूव्हसह साजरा केला गेला. काही दिवसांपूर्वी रिलीज झालेल्या याच चित्रपटातील 'विघ्नहर्ता' या गाण्याच्याअभूतपूर्व यशानंतर, ‘अंतिम: द फायनल ट्रूथ’ चे निर्माते 'भाई का बर्थडे' सोबत पुन्हा एकदा संगीतप्रेमींच्या मनावर राज्य करण्यासाठी सज्ज झाले आहेत.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

नृत्यदिग्दर्शक मुदस्सर यांनी कोरिओग्राफ केलेल्या डान्स मूव्ह्ससह, गाण्याचे व्हिज्युअल सुंदर झाले असून ते चाहत्यांसाठी निःसंशयपणे एक मेजवानी ठरेल. भारतातील सर्वात मोठ्या सिंगल-स्क्रीन थिएटरपैकी एक असे जयपूर मधील राजमंदिर सिंगल-स्क्रीन थिएटरला आयुषने भेट दिली, जिथे तो त्या सर्व चाहत्यांना भेटला ज्यांचा वाढदिवस नोव्हेंबरमध्ये असतो. या गाण्याचे संगीत खूप आकर्षक आणि त्यावर बसविलेला डान्स निःसंशयपणे देशातील आगामी ‘वाढदिवस’ गाणे ठरले तर नवल वाटायला नको. अनेक प्रियजनांच्या वाढदिवसासाठीच्या गाण्यांच्या यादीत एका नवीन गाण्याची भर पडली आहे.

सलमान खानचा मेव्हणा आयुष शर्मा
सलमान खानचा मेव्हणा आयुष शर्मा

गाण्याबद्दल बोलताना आयुष शर्माने म्हणाला की, "भाई का बर्थडे हे गाणे खूप मस्त, सेलिब्रेट करण्यासारखे गाणे आहे. जेव्हा सगळे मित्र एखाद्या सेलिब्रेशनसाठी एकत्र येतात, तशा खूप खऱ्या आणि वास्तविक भावना यात आहेत. मी याचे शूटिंग करताना खूप एन्जॉय केले आहे. विशेषतः डान्स स्टेप्स जे पूर्णपणे मजेदार आणि देसी आहेत. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, गाणे चित्रपटात एक अतिशय मनोरंजक ट्विस्ट घेऊन येते, ज्यामुळे ते प्रत्यक्ष पाहण्यासारखे आणि मनोरंजक आहे.

हे गाणे हितेश मोडक यांनी संगीतबद्ध केले असून, बैकग्राउंड वोकल्स साजिद खान यांनी केले आहेत. रवी बसरूर यांच्या एडिशनल प्रोग्रामिंग सोबत नृत्यदिग्दर्शन मुदस्सर यांचे आहे. ट्रेलर रिलीजला मिळत असलेला उदंड प्रतिसाद लक्षात घेता, प्रेक्षक निःसंशयपणे चित्रपटगृहांमध्ये हा चित्रपट पाहण्यासाठी उत्सुक आहेत.

सलमान खान, आयुष शर्मा आणि महिमा मकवाना यांच्या मुख्य भूमिका असलेल्या 'अंतिम: द फाइनल ट्रुथ' या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर यांनी केले आहे. हा चित्रपट सलमा खान द्वारे निर्मित आणि सलमान खान फिल्म्स द्वारे प्रस्तुत करण्यात आला आहे.

‘अंतिम: द फायनल ट्रूथ’ हा चित्रपट येत्या २६ नोव्हेंबरला झी स्टूडियोज द्वारा थिएटर्समध्ये प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा - एसएस राजमौली यांच्या 'आरआरआर' मध्ये दिसणार अजय देवगण, जूनियर एनटीआर, राम चरण आणि आलिया भट!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.