हैदराबाद - बॉलीवूड आणि दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अभिनेत्री तमन्ना भाटिया हिला कोरोनाची लागण झाली आहे. माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, तमन्ना हैदराबादमध्ये एका वेब सिरीजचे शुटिंग करत होती. तेव्हा तिला थोडेसे अस्वस्थ वाटू लागले. तेव्हा तिची चाचणी करण्यात आली, यात तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
तमन्नाची चाचणी पॉझिटिव्ह आल्यानंतर तिला हैदराबादमधीलच एका खासजी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. देशभरातील तिचे चाहते, ती यातून लवकर बाहेर पडावी यासाठी तिला शुभेच्छा देत आहेत. अनेकांनी सोशल मीडियावर 'गेट वेल सून' असा मॅसेज तमन्नासाठी लिहला आहे.
याआधी तमन्नाचे वडिल संतोष भाटिया आणि आई रजनी भाटिया या दोघांनाही कोरोनाची लागण झालेली आहे. याची माहिती खुद्द तमन्ना हिनेच सोशल मीडियावर एक फोटो शेअर करुन दिली होती. तमन्नाने तिच्या पोस्टमध्ये, आई वडिलामध्ये कोरोनाची लक्षणे दिसून येत होती, त्यामुळे त्यांची चाचणी करण्यात आली. यात त्यांना लागण झाल्याचे दिसून आले, असल्याचे म्हटलं होतं.
तमन्ना लवकरच बॉलीवूड चित्रपट 'बोले चूडियां'मध्ये भूमिका करताना पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी आणि कबीर दुहन सिंह हे प्रमुख भूमिकेत आहेत. दरम्यान, आतापर्यंत अनेक सेलिब्रेटींनी कोरोनाची लागण झालेली आहे. अमिताभ बच्चन, अभिषेक बच्चन, ऐश्वर्या राय, मलायका अरोरा, अर्जुन कपूर, आफताब शिवदासनी, जेनेलिया डिसूजा-देशमुख हे कोरोना बाधित झाले होते.
हेही वाचा - करण जोहरने पंतप्रधान नरेंद्र मोदींना लिहिले पत्र, दिले 'हे' आश्वासन
हेही वाचा - हंगामा 2 च्या उर्वरीत चित्रीकरणासाठी 'या' कलाकारांचे मनालीकडे प्रस्थान