मुंबई - बॉलिवूडमधील आघाडीचा अभिनेता आयुष्मान खुराणाचा आज वाढदिवस आहे. यानिमित्ताने आयुष्मानची पत्नी ताहिर कश्यप हिने पतीसाठी एक खास पोस्ट शेअर केली आहे. ताहिरानं आयुष्मानसोबतचे आपले काही फोटो शेअर केले आहेत आणि त्याला कॅप्शनही दिलं आहे.
कॅप्शनमध्ये तिनं म्हटलं, या लाडक्या आणि प्रेमळ माणसाला वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुझी प्रगती आणि होणारा बदल पाहणं माझ्यासाठी खूप खास होतं. तुझ्यासोबत आयुष्य खूप सुंदर आहे. यासोबतच तिनं आयुष्मानच्या वाढदिवसाला हजेरी लावलेल्या सर्व कलाकारांसोबतचा एक फोटो शेअर करत हा दिवस अधिक खास बनवण्यासाठी त्यांचे आभार मानले आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
चित्रपटांबद्दल बोलायचं झाल्यास, आयुष्मान नुकताच ड्रीम गर्ल सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. त्याच्या या सिनेमाला चित्रपट विश्लेषकांकडून चांगल्या प्रतिक्रिया मिळत आहे. याशिवाय तो लवकरच बाला चित्रपटातूनही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.