ETV Bharat / sitara

स्वरानं ट्विट करत केलं मुघलांचं कौतुक, पुन्हा झाली ट्रोल - muslim terrorist

मुघलांबद्दल केलेल्या एका ट्विटमुळे नेटकऱ्यांनी स्वरावर चांगलाच निशाणा साधला आहे. काहींनी तिला मुस्लिम दहशतवादी म्हटलं आहे. तर काहींनी चर्चेत राहण्यासाठी स्वरा नेहमीच असे ट्विट करत असल्याचे म्हटले आहे.

स्वरानं ट्विट करत केलं मुघलांचं कौतुक
author img

By

Published : Jul 14, 2019, 1:38 PM IST

Updated : Jul 14, 2019, 2:07 PM IST

मुंबई - अभिनेत्री स्वरा भास्कर चित्रपटांहूनही अधिक आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत असते. यामुळेच अनेकदा तिच्यावर ट्रोल होण्याची वेळ येते. अशात आता पुन्हा एकदा स्वराला आपल्या एका ट्विटमुळे नेटकऱ्यांच्या टीकांचा सामना करावा लागत आहे.

मुघलांबद्दल केलेल्या एका ट्विटमुळे नेटकऱ्यांनी तिच्यावर चांगलाच निशाणा साधला आहे. मुघलांनी भारताला श्रीमंत बनवलं, असं म्हणत स्वराने आपल्या ट्विटमध्ये मुघलांचं कौतुक केलं आहे. यासोबतच तिनं या ट्विटला तथ्य आणि इतिहाससारख्या शब्दांचे हॅशटॅगही दिले आहेत.

तिच्या या ट्विटनंतर काहींनी तिला मुस्लिम दहशतवादी म्हटलं आहे. तर काहींनी चर्चेत राहण्यासाठी स्वरा नेहमीच असे ट्विट करत असल्याचे म्हटले आहे. तर एका यूजरने स्वरा तुझ्या या तर्कानुसार पाहायला गेल्यास पाकिस्तान अजूनही गरीब देश आहे. मग आपण त्यांच्यावर हल्ला करून त्यांच्यावर राज्य करत पाकिस्तानचा विकास केल्यास चालेल का? असा सवाल केला आहे.

Intro:Body:Conclusion:
Last Updated : Jul 14, 2019, 2:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.