ETV Bharat / sitara

सुशांतसिंह राजपूतचा 'छिछोरे' चीनमध्ये होणार रिलीज!!

सुशांत सिंग राजपूतचा 'छिछोरे' हा चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित होणार आहे. आमिर खानचा 'दंगल' हा शेवटचा चित्रपट 2017 मध्ये चीनमध्ये प्रचंड गाजला होता. 'छिछोरे' हा कॉमेडी-ड्रामा चित्रपट 100 हून अधिक शहरांमध्ये 11 हजार स्क्रीन्सवर प्रदर्शित केला जाईल.

author img

By

Published : Dec 15, 2021, 10:18 PM IST

'छिछोरे' चीनमध्ये होणार रिलीज
'छिछोरे' चीनमध्ये होणार रिलीज

बीजिंग : दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूतचा 'छिछोरे' हा चित्रपट 7 जानेवारी 2022 रोजी चीनमध्ये प्रदर्शित होणार आहे. राष्ट्रीय पुरस्कार विजेते नितेश तिवारी दिग्दर्शित हा चित्रपट आता चीनमध्ये प्रदर्शित होणार आहे. कॉमेडी-ड्रामा असलेला हा चित्रपट 100 हून अधिक शहरांमध्ये 11 हजार स्क्रीन्सवर प्रदर्शित होणार आहे. चीन हे सर्वात मोठ्या फिल्म मार्केटपैकी एक आहे. आमिर खान स्टारर चित्रपट 'दंगल' 2017 मध्ये चीनमध्ये प्रचंड हिट झाला होता.

बॉक्स ऑफिसवर जबरदस्त यशस्वी चित्रपट

छिछोरे हा चित्रपट 6 डिसेंबर 2019 रोजी भारतात प्रदर्शित झाला. दोन आठवड्यांनंतर, चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 100 कोटींहून अधिक कमाई केली. आता 2 वर्षांनंतर हा चित्रपट चीनमध्ये प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात सुशांत सिंग राजपूत आणि श्रद्धा कपूर मुख्य भूमिकेत होते. याशिवाय वरुण शर्मा, नवीन पॉलिशेट्टी, तुषार पांडे, ताहिर राज भसीन, प्रतीक बब्बर हे कलाकारही या चित्रपटात होते. प्रेक्षकांनी या चित्रपटाचे खूप कौतुक केले आहे आणि प्रत्येक पात्राला पसंती दिली आहे.

'छिछोरे'ला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार

छिछोरे हा चित्रपट 2019 च्या सर्वात हिट चित्रपटांपैकी एक होता. 'छिछोरे'ला सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. यासोबतच फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये 5 नामांकनेही मिळाली. या चित्रपटाचे दिग्दर्शन नितेश तिवारी यांनी केले होते. चित्रपटाचे दिग्दर्शक नितेश तिवारी यांनी हा पुरस्कार चित्रपटात मुख्य भूमिका साकारणारा अभिनेता सुशांत सिंग राजपूतला समर्पित केला होता.

दंगल चीनमध्ये ठरला होता सुपरहिट

2017 मध्ये प्रदर्शित झालेला आमिर खानचा दंगल हा चित्रपट चीनमध्ये चांगलाच गाजला होता. दंगलला चीनमध्ये प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि हा चित्रपट सुपरहिट ठरला. चीनमुळे चित्रपटाचे बॉक्स ऑफिस कलेक्शनही वाढले. विशेष म्हणजे हा चीनमध्ये सर्वाधिक कमाई करणारा भारतीय चित्रपट ठरला होता. आता 7 जानेवारीला छिछोरे चीनमध्ये प्रदर्शित होत आहे. छिछोरेला चीनमध्ये दंगलसारखा प्रतिसाद मिळेल का? हे पाहण्यासारखे असेल.

हेही वाचा - पाहा, नवविवाहित राजकुमार आणि पत्रलेखाचा मजेशीर फोटो

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.