मुंबई - ठग सुकेश चंद्रशेखरच्या 200 कोटी रुपयांच्या फसवणुकीच्या प्रकरणात ( Sukesh Chandrasekhar 200 Crore Fraud Case ) अंमलबजावणी संचालनालय (ईडी) कोणतीही ढिलाई पडू देत नाही. या प्रकरणात बॉलिवूडची डान्सर गर्ल नोरा फतेही ( Bollywood Dancer Girl Nora Fatehi )हिला सरकारी साक्षीदार म्हणून हजर करण्याची तयारी सुरू आहे. या प्रकरणी ईडीने सुकेश आणि जॅकलिनची अनेकदा चौकशीही केली आहे. आतापर्यंत या प्रकरणात बॉलिवूडमधून फक्त जॅकलिन फर्नांडिस आणि नोरा फतेही यांचीच नावे समोर आली होती. ईडीच्या चौकशीत सुकेशने जॅकलीन आणि नोराशिवाय या काही बॉलिवूड स्टार्सचीही नावे सांगितली होती.
सुकेश चंद्रशेखरची जॅकलिनवर उधळपट्टी
जॅकलिन फर्नांडिसच्या सुकेश चंद्रशेखरसोबतच्या वैयक्तिक फोटोंनी इंटरनेटवर धुमाकूळ घातल्यानंतर बॉलीवूडमध्ये खळबळ उडाली होती. त्यानंतर ईडीही सतर्क झाली. सुकेशने जॅकलीनला गुच्ची जिम वेअर, गुच्ची शूज, रोलेक्स घड्याळ, 15 जोड्या कानातले, पाच बर्किन बॅग्ज, ब्रँडेड बांगड्या आणि आंतरराष्ट्रीय ब्रँड लुई व्हिटॉनच्या बॅग भेट दिल्याचे अलीकडेच समोर आले आहे. याशिवाय ईडीने दिलेल्या निवेदनात सुकेशने सांगितले होते की, त्याने जॅकलिनच्या खात्यात 1.80 लाख डॉलर देखील ट्रान्सफर केले होते.
नोरा फतेही सरकारी साक्षीदार होणार
या प्रकरणात बॉलिवूडची आयटम नंबर गर्ल नोरा फतेहीचे दुसरे नाव समोर आले. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुकेशची पत्नी लीना हिने नोराला एक बीएमडब्ल्यू कार गिफ्ट म्हणून दिली होती, मात्र नोराने याचा इन्कार केला आहे. आता नोराला या खटल्यात सरकारी साक्षीदार म्हणून हजर केले जाणार आहे. ईडी लवकरच जॅकलिन आणि नोरा यांना दिलेल्या भेटवस्तू जप्त करणार आहे.
सुकेशने चौकशीत अभिनेत्री श्रद्धा कपूरचेही नाव घेतले. सुकेशच्या वक्तव्यानुसार, सुकेश 2015 पासून श्रद्धा कपूरला ओळखतो. अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या मृत्यूनंतर एनसीबीने चालवलेल्या ड्रग्ज प्रकरणात श्रद्धा कपूरला मदत केल्याचे सुकेशने आपल्या वक्तव्यात सांगितले होते, परंतु अभिनेत्री श्रध्दाने सुकेशच्या वक्तव्यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
हेही वाचा - Nora Fatehi Prosecution Witness : नोरा फतेही ठग सुकेश चंद्रशेखर विरुद्ध होणार फिर्यादी साक्षीदार
सुकेशचा आणखीही बॉलिवूड स्टारसोबत होता संपर्क
त्याचबरोबर सुकेशने ईडीला दिलेल्या निवेदनात बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचेही नाव घेतले होते. राज कुंद्राच्या पॉर्न फिल्म मेकिंग प्रकरणात तो शिल्पा शेट्टीच्या संपर्कात असल्याचे त्याने सांगितले होते.
सुकेश चंद्रशेखरने ईडीच्या चौकशीत बॉलिवूड अभिनेता हरमन बावेजाचे नावही ओढले होते. अभिनेता हरमन बावेजासोबत कार्तिक आर्यन स्टारर 'कॅप्टन' या चित्रपटाची निर्मिती करण्याचा विचार करत असल्याचे सुकेशने आपल्या वक्तव्यात सांगितले होते. सुकेशच्या या वक्तव्यावर हरमन आणि कार्तिक दोघांकडूनही कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
काय आहे 200 कोटींची फसवणूक प्रकरण?
सुकेश चंद्रशेखर नावाचा ठग 2017 पासून राजधानी दिल्लीच्या तिहार तुरुंगात शिक्षा भोगत आहे. याने तुरुंगात असताना प्रसिद्ध औषध कंपनी रॅनबॅक्सीच्या माजी प्रवर्तकाच्या पत्नीची २०० कोटी रुपयांची फसवणूक केली होती. प्रकरण असे होते की फार्मा कंपनीचे माजी प्रवर्तक तुरुंगात होते, त्यांना तुरुंगातून बाहेर आणण्याच्या बदल्यात सुकेशने पत्नी अदिती सिंगला कंपनीचा होम सेक्रेटरी असल्याचे सांगत फसवले होते. सुकेशने गृहमंत्री अमित शहा यांच्यापर्यंत पोहोचल्याची माहिती दिली आणि त्यानंतर 200 कोटी रुपयांची मागणी केली. सुकेशकडे आल्यानंतर अदिती सिंहने 200 कोटी रुपये ट्रान्सफर केले होते.
हेही वाचा - Tiger Shroff Injured : 'गणपथ'च्या शुटिंग दरम्यान टायगर श्रॉफ जखमी, डोळा थोडक्यात बचावला