हैदराबाद - शाहरुख खानची मुलगी सुहाना खान हिने रंगभेदाबद्दल व्यक्त केलेले मत सध्या चर्चेचा विषय ठरले आहे. तिच्या या मतावरुन तिला सोशल मीडियावर ट्रोलही करण्यात आले होते. तिच्यासारख्या तरुण मुलींवर याचा काय परिणाम होऊ शकतो, ही बाब समजून घेण्यासारखी आहे. असे असले तरी तिचा बाप शाहरुख खान मात्र फेअरनेस क्रीमच्या जाहिराती करीत असतो. त्यामुळे सुहानाच्या मताविरुद्धच तो वागतोय यात शंका नाही.
सुहानासाठी ट्रोलिंगचा अनुभव काही नवखा नाही. स्टार किड म्हणून तिच्यावर अनेकवेळा टीका झालेली आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीत तिच्या त्वचेच्या रंगावरुन टीका केली जात आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
सुहानाने इन्स्टाग्रामवर लिहिलेल्या पोस्टमध्ये तिला 'कुरुप' म्हटल्याचे लिहिले आहे. तिचा रंग गव्हाळ असल्यामुळे ही टीका केली जात आहे. सोशल मीडिया आणि मॅच मेकिंग साईटने ठरवलेल्या सौंदर्याच्या कल्पना आपल्या आयुष्यावर लादल्या जाऊ नयेत, असे तिने म्हटलंय.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
सुहानाने आपल्या पोस्टचा शेवट 'एन्ड कलरिजम' या हॅशटॅगने केला आहे. रंगभेदचा शेवट व्हावा, यासाठी तिने जोरदार बॅटिंग केली असली तरी तिचे वडील शाहरुख खान पुरुषांसाठी वापरल्या जाणाऱ्या फेअरनेस क्रीमचा चेहरा आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
ट्रेड रिपोर्टनुसार, एका आघाडीच्या कंपनीने शाहरुखला पुरुषांच्या फेअरनेस क्रीमचा ब्रँड अॅम्बेसेडर म्हणून साईन केले आहे. २००७ पासून तो या कंपनीच्या करारात असून २०१९ मध्ये त्याने २०२१ पर्यंतच्या करारावर सही केली आहे.
वर्णभेदाला प्रोत्साहन देणाऱ्या फेअरनेस क्रीम ब्रँडचा चेहरा असणारा शाहरुख स्वतःची मुलगी आणि सावळा वर्ण असलेल्या स्त्रिया सहन करीत असलेल्या या टीकेकडे कसे पाहतो? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
त्वचेचा रंग उजळ करणाऱ्या क्रीमचा प्रचार करण्याबद्दल शाहरुखची आपली काही मते आहेत. त्याने एका जुन्या मुलाखतीत म्हटले होते की, ''हे हानीकारक नाही आणि मी गोऱ्या रंगापेक्षा काळा रंग किंवा काळ्या रंगाहून उजळ रंग चांगला असल्याबाबतची विक्री करीत नाही. मी त्या प्रकारची व्यक्ती नाही.''
सुपरस्टार असलेला शाहरुख खान आपल्या लाडक्या विचारी तरुण मुलीच्या नव्या विचारांशी जुळवून घेण्यासाठी समर्थ आहे.
ब्लॅक लाइव्हज मॅटर मोहिमेनंतर ग्लोबल स्किनकेअर ब्रँड त्यांच्या लेबलमधून "फेअर" आणि "व्हाइट" काढून टाकत आहेत. पण फक्त शब्द काढून टाकल्याने यात काही फरक पडणार नाही.
भारतासारख्या देशामध्ये गौरवर्ण हा सौंदर्याची एक मापदंड समजला जातो. ही एक खोलवर रुजलेली समस्या आहे. याबद्दलच्या चर्चेला सुरूवात झाली आहे. असे पूर्वग्रह समूळ संपवण्याची प्रक्रिया सुरू होणे काळाची गरज आहे.