ETV Bharat / sitara

Stay order on Lock Upp : 'लॉक अप' शो प्रसारित झाल्यास कोर्टाचा अपमान; याचिकाकर्त्यांचा दावा - कंगना राणावत लॉक अप शो

कंगना राणौत होस्ट करत असलेल्या लॉक अप (Kangana Ranaut Lock upp) या रिअॅलिटी शोला हैदराबाद शहर दिवाणी न्यायालयाने (Hyderabad Civil Court) स्थगिती दिली आहे. हा शो रविवारपासून प्रसारित होत आहे. त्यामुळे हा शो कोणत्याही इलेक्ट्रॉनिक किंवा सोशल मीडियावर प्रसारित होणार नाही.

Lock Upp
Lock Upp
author img

By

Published : Feb 27, 2022, 1:35 PM IST

मुंबई : कंगना राणौत होस्ट करत असलेल्या लॉक अप (Kangana Ranaut Lock upp) या रिअॅलिटी शोला हैदराबाद शहर दिवाणी न्यायालयाने (Hyderabad Civil Court) स्थगिती दिली आहे. हा शो रविवारपासून प्रसारित होत आहे. त्यामुळे हा शो कोणत्याही इलेक्ट्रॉनिक किंवा सोशल मीडियावर प्रसारित होणार नाही. शोच्या ट्रेलरच्या व्हिडिओ क्लिपची न्यायलयाने दखल घेतल्यानंतर, अंतरिम आदेश ( Stay order on Lock Upp ) जारी केला आहे.

याचिकाकर्ते आणि उद्योगपती सनोबर बेग यांच्या कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. यात कंगनाच्या शो 'लॉक अप'चे स्वरूप याचिकाकर्त्याच्या रजिस्टर आयडिया 'द जेल'च्या (The Jail) स्क्रिप्टशी जुळत असल्याचा दावा केला आहे. प्राइड मीडियाचे मालक सनोबेर बेग यांनी द जेल या शो ची संकल्पना शंतनु रे आणि शीरशाक आनंद यांनी लिहिली होती. आणि 7 मार्च 2018 रोजी कॉपीराईट कायद्यांतर्गत नोंदणी केली आहे. यात ही संकल्पना कशी विकसित झाली हे याचिकेत स्पष्ट केले आहे आणि विविध टप्प्यांवर त्यांनी गुंतवलेल्या पैशाच्या तपशीलांची यादी देखील दिली आहे.

लवकरच हा शो आणणार होतो

या शोचा प्रोमो पाहिला तेव्हा मला धक्काच बसला. एन्डेमोल शाइनच्या अभिषेक रेगे यांच्याशी मी बऱ्याच काळापासून संपर्कात आहे. हैदराबादमध्ये या विषयावर अनेक बैठका झाल्या आहेत. हा शो ची निर्मिती करण्याचा विचार होता."हा शो केवळ आमच्या संकल्पनेशी मिळतीजुळता नाही, तर त्याची कॉपीच आहे. या संकल्पनेची इतक्या प्रमाणात चोरी करू शकेल यावर माझा विश्वास बसत नाही. आमच्याकडे सगळे तपशील आहे, असेही याचिकाकर्ते सनोबेर बेग यांनी सांगितले.

AltBalaji चा बोलण्यास नकार

न्यायलयात आरोप सिध्द झाल्यास एकता कपूरचे AltBalaji प्रोडक्शन हाऊस कॉपीराइट कायद्याच्या कलम 51 आणि 52 अंतर्गत जबाबदार असेल. प्रॉडक्शन हाऊसने त्याच्याशी संवाद साधण्यास नकार दिल्यानंतरच सनोबरने न्यायालयात धाव घेतली.

हेही वाचा - Kangana Ranaut Lock Upp : कंगना रणौतचा 'लॉक अप' शो अडचणीत, कोर्टाने दिले स्थिगितीचे आदेश

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.