मुंबई - कोरोना विषाणूचा जगभर वाढता प्रादुर्भाव पाहता कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य कर्मचारी, पोलीस यंत्रणा, अन्नपुरवठा कर्मचारी, सफाई कामगार हे सर्व प्रचंड मेहनत घेत आहेत. अशा परिस्थिती नागरिकांमध्ये सकारात्मकता निर्माण करण्यासाठी कलाविश्वातील कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून काही ना काही सकारात्मक पोस्ट शेअर करत असतात. कोरोनाच्या लढ्यात आर्थिक मदतीसाठी देखील बरेच कलाकार पुढे आले आहेत. अभिनेता सोनू सुदने देखील या लढ्यात मदत केली आहे. तसेच, त्याने आपल्या एका कवितेतून कोरोना योद्ध्यांचे आभार मानले आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
सोनू सुदने मुंबईतील २५ हजारापेश्रा अधिक प्रवाश्यांच्या जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था केली आहे. याशिवाय एका अभियानाअंतर्गत तो दररोज ४५ हजार लोकांपर्यंत जेवण पुरवठा करत आहे. तसेच त्याने आरोग्य कर्मचाऱ्यांसाठी जुहू येथील हॉटेल राहण्यासाठी दिले आहे.
आता सोनूने एक भावनात्मक कविता लिहिली आहे. या कवितेला त्यानेच आवाज दिला आहे.
"माना की घनी रात है, इस रात से लड़ने के लिए पूरा भारत साथ है, तेरी कोशिश मेरी कोशिश रंग लाएगी, फिर उसी भीड़ का हिस्सा होंगे, बस सिर्फ कुछ दिनों की बात है.. माना की घनी रात है, मगर पूरा भारत एक साथ है.", अशा या कवितेच्या ओळी आहेत.
या कवितेबाबत सांगताना तो म्हणाला, की ही कविता माझ्या हृदयाच्याय अत्यंत जवळची आहे. मला भारतीयांसाठी काहीतरी करायचे होते. विशेषत: कोरोनाशी लढणाऱ्या योद्ध्यांसाठी काहीतरी मदत करण्याची संधी मला मिळाली, त्याचा आनंद आहे. या कवितेतून मी त्यांचे आभार मानतो. तसेच, या कवितेने इतरांनाही नक्कीच प्रेरणा मिळेल, असे तो म्हणाला.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
सोनू सुदची 'भारत एक साथ है', ही कविता टी सीरिज द्वारे प्रस्तुत करण्यात आली आहे.