ETV Bharat / sitara

अजय देवगणच्या ‘मे-डे’ च्या सेटवर पोहोचला सिद्धार्थ मल्होत्रा! - सिद्धार्थ मल्होत्रा न्यूज

सिद्धार्थ मल्होत्रा आणि अजय देवगण या दोघांनाही ‘मे-डे’ च्या सेटवरील या अचानक भेटीमुळे आनंद नक्कीच झाला असणार.

entertainment
entertainment
author img

By

Published : Jan 29, 2021, 6:14 AM IST

मुंबई - विनोदाच्या सर्व प्रकारांवर चित्रपट बनवत निखळ मनोरंजन करण्यासाठी ओळखले जाणारे इंद्र कुमार यांनी अजय देवगण, सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि रकुल प्रीत सिंग यांना एकत्रितपणे आपल्या आगामी ‘थँक गॉड’ या संदेशयुक्त विनोदी चित्रपटासाठी करारबद्ध केले असून त्याचे शुटिंगही नुकतेच सुरु झाले. अजय व राकुल यांनी याआधी एकमेकांसोबत काम केलेलं आहे. अजय देवगण आणि सिद्धार्थ मल्होत्रा हे प्रथमच एकत्र काम करीत असून त्यांची मैत्री तशी नवीनच आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा ​​इंद्र कुमारच्या बहुप्रतिक्षित कॉमेडी 'थँक्स गॉड' चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी फिल्म सिटीमध्ये आला तेव्हा त्याला कळले की जवळच त्याचा ‘थँक गॉड’ चा सहकलाकार, अजय देवगण त्याच्या ‘मे-डे’ चे शूटिंग करतोय. बॉलिवूडमधील प्रचलित ज्युनियर-सिनियर शिष्टाचार पाळत लगेचच सिद्धार्थ मल्होत्रा अजय देवगनच्या सेटवर पोहोचला. सुदैवाने तिथे ‘लंच ब्रेक’ झालेला होता व सिद्धार्थला अजयसोबत ‘क्वालिटी टाईम’ घालवता आला. बऱ्याच काळानंतर अजय देवगण दिग्दर्शन करतोय व सिद्धार्थ ने ‘मे -डे’ बद्दल त्याच्याकडे चौकशी केली. अजय ने ही दोघांच्या ‘थँक गॉड’ बद्दल चर्चा केली व लवकरच तो त्या चित्रपटाच्या शूटसाठी उपलब्ध होईल असे सांगितले.

सिद्धार्थ मल्होत्रा आणि अजय देवगण या दोघांनाही ‘मे-डे’ च्या सेटवरील या अचानक भेटीमुळे आनंद नक्कीच झाला असणार व ‘लंच-ब्रेक’ मध्ये दोघांमधील असला-नसलेला ‘आईस-ब्रेक’ सुद्धा झाला असणार ज्याचा ‘थँक गॉड’ च्या चित्रीकरणावेळी नक्कीच फायदा होईल.

‘थँक्स गॉड’ चित्रपटात अजय देवगण आणि सिद्धार्थ प्रथमच एकत्र काम करणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.