मुंबई - अभिनेत्री श्रुती हासनच्या सौंदर्याचे अनेक चाहते आहेत. सोशल मीडियावर तिने शेअर केलेल्या फोटोंवर चाहत्यांच्या बऱ्याच प्रतिक्रिया पाहायला मिळतात. मात्र, अलीकडेच श्रुतीने एक पोस्ट शेअर करून तिच्या चेहऱ्यावर प्लास्टिक सर्जरी करण्यात आली असल्याचं सांगितलं आहे. तिच्या पोस्टनंतर काही जणांनी तिला ट्रोलर करण्याचा प्रयत्न केला. मात्र, श्रुतीने ट्रोलर्सला सडेतोड उत्तर देणारी एक पोस्ट शेअर केली आहे.
-
So .... I decided to post this right after my previous post and I’ll tell you why. I’m not one driven by other people’s opinions of me but the constant commenting and she’s too fat now she’s too thin is so avoidable.… https://t.co/ieTGEZnkvR
— shruti haasan (@shrutihaasan) February 27, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">So .... I decided to post this right after my previous post and I’ll tell you why. I’m not one driven by other people’s opinions of me but the constant commenting and she’s too fat now she’s too thin is so avoidable.… https://t.co/ieTGEZnkvR
— shruti haasan (@shrutihaasan) February 27, 2020So .... I decided to post this right after my previous post and I’ll tell you why. I’m not one driven by other people’s opinions of me but the constant commenting and she’s too fat now she’s too thin is so avoidable.… https://t.co/ieTGEZnkvR
— shruti haasan (@shrutihaasan) February 27, 2020
श्रुतीने या पोस्टमध्ये लिहलंय, की 'मी माझ्या मागच्या पोस्टनंतर लगेच ही पोस्ट शेअर करत आहे. मी दुसऱ्यांच्या विचारधारेनुसार चालणारी व्यक्ती नाही. मात्र, काही लोकांना तुम्हाला योग्य वेळी उत्तर द्यावेच लागते. हेच लोक जेव्हा तुम्हाला तू खूप जाड आहेस, ती खूप बारीक आहे यांसारख्या प्रतिक्रिया द्यायला लागतात. तेव्हा या गोष्टींकडे दुर्लक्ष करणं त्रासदायक ठरू शकतं. हे दोन्ही फोटो मी तीन दिवसांच्या फरकानंतर काढले आहेत'.
हेही वाचा -बॉलिवूडचं 'हे' कपल लवकरच अडकणार लग्नबंधनात
'मी इतक्या वर्षात माझ्या मेहनतीने सर्वांसोबत चांगले नाते तयार केले आहे. हे सोपं नव्हतं. तरीही मी असं केलं. जी व्यक्ती प्रसिद्ध असते, ती दुसऱ्यांविषयी आपले मत कधीच बनवत नाही. मला हे सांगताना आनंद होतोय, की हे माझं आयुष्य आहे. माझा चेहरा आहे. होय, मी प्लास्टिक सर्जरी केली आहे. कारण, मला असंच राहायचं आहे. मी या गोष्टीला प्रमोट करत नाही. मात्र, मी या गोष्टीच्या विरोधातही नाही. तुमच्या शरीरात जे बदल होतात, त्याला फक्त स्वीकारा. सर्वांवर प्रेम करा आणि आनंदी राहा', या शब्दांमध्ये श्रुतीने आपले मत स्पष्ट केले आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर, सध्या ती काजोलसोबत आगामी 'देवी' या शॉर्टफिल्मच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. अलीकडेच या शॉर्टफिल्मचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. महिलांवर आधारित ही शॉर्टफिल्म आहे.
हेही वाचा -टायगर श्रॉफच्या 'हिरोपंती'चा येणार सिक्वेल, पोस्टर प्रदर्शित