ETV Bharat / sitara

राज कुंद्रा विरोधात तक्रार देण्यासाठी शर्लिन चोप्राने गाठले पोलीस स्टेशन - Etv Bharat news

अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी शर्लिन तिच्या वकिलांसह पोलीस स्टेशनमध्ये हजर झाली आहे. ती बाहेर येईल आणि माध्यमांशी बोलेल, यासाठी माध्यमकर्मींनी पोलीस स्टेशन बाहेर गर्दी केली आहे.

अभिनेत्री आणि मॉडेल शर्लिन चोप्रा
अभिनेत्री आणि मॉडेल शर्लिन चोप्रा
author img

By

Published : Oct 14, 2021, 7:27 PM IST

मुंबई - अभिनेत्री आणि मॉडेल शर्लिन चोप्रा हिने जुहू पोलीस स्टेशन गाठले आहे. प्रसिद्ध अभिनेत्री शिल्पा शेट्टीचा पती राज कुंद्राविरोधात तक्रार दाखल करण्यासाठी शर्लिन तिच्या वकिलांसह पोलीस स्टेशनमध्ये हजर झाली आहे. शर्लिनच्या म्हणण्यानुसार, राज कुंद्राने तिच्या कामाचे पैसे अद्याप परत केलेले नाहीत. या कारणास्तव तिला राज कुंद्राविरोधात मुंबई पोलिसात एफआयआर नोंदवायचा आहे.

शर्लिन चोप्रा जुहू पोलीस स्टेशनच्या आत गेली आहे. ती बाहेर येईल आणि माध्यमांशी बोलेल, यासाठी माध्यमकर्मींनी पोलीस स्टेशन बाहेर गर्दी केली आहे. ती पोलीस स्टेशनला पोहोचणार असल्याची कल्पना तिच्यावतीने माध्यमांना देण्यात आली होती.

शर्लिन चोप्राची राज कुंद्रा विरोधात तक्रार

राजच्या वकिलांनी एक निवेदन जारी केले -

शिल्पा शेट्टीचे पती राजच्या वकिलांनी एक निवेदन जारी करून म्हटले आहे की, न्यायालयात तिच्या फौजदारी कारवाईसाठी ती स्वतः जबाबदार असेल. ऑगस्टमध्ये शर्लिन चोप्राची मुंबई गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने सुमारे आठ तास चौकशी केली होती.

एप्रिल 2021 मध्ये शर्लिनने राज कुंद्राविरोधात लैंगिक छळासाठी एफआयआर दाखल केला होता. भारतीय दंड संहितेच्या कलम 67, 67 (अ), माहिती तंत्रज्ञान कायदा 2008, महिलांचे अभद्र प्रतिनिधित्व अधिनियम 1986 चे कलम 376 अन्वये हा आरोप करण्यात आला होता.

हेही वाचा - अभिनेत्री नोरा फतेही 'ईडी' कार्यालयात दाखल, जॅकलीन फर्नांडिस उद्या लावणार हजेरी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.