ETV Bharat / sitara

आर्यन खान क्रूज ड्रग प्रकरणी शत्रुघ्न सिन्हा यांनी साधला पंतप्रधान मोदींवर निशाणा

author img

By

Published : Oct 13, 2021, 4:29 PM IST

ज्येष्ठ अभिनेता शत्रुघ्न सिन्हा बॉलिवूडवर त्याच्या कडक शैलीत भडकला आहे. आर्यन खानचे वडील आणि शाहरुख खान यांना मदत करण्याची हीच वेळ आहे, पण गोदी माध्यमांच्या भीतीमुळे कोणीही पुढे येऊ इच्छित नाही, असे शत्रुघ्नने म्हटले आहे. फिल्म इंडस्ट्रीत भित्र्या लोकांचा भरणा असल्याचे शत्रुघ्न यांनी म्हटलंय.

शत्रुघ्न सिन्हांचा पंतप्रधान मोदींवर निशाणा

मुंबई - ज्येष्ठ अभिनेता आणि काँग्रेस नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी क्रूज ड्रग्स प्रकरणात मुंबईच्या आर्थर रोड जेलमध्ये बंद असलेला सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला पाठिंबा दिला आहे. शत्रुघ्न सिन्हा यांनी आपल्या स्पष्ट शैलीत बॉलिवूडचे वर्णन घाबरलेल्या लोकांचा समूह असे केले आहे. यासोबतच शत्रुघ्न सिन्हा यांनी आर्यन खानला पाठिंबा देत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि प्रसारमाध्यमांवर जोरदार निशाणा साधला आहे. शत्रुघ्न म्हणाले की, शाहरुख खानला यावेळी फिल्म इंडस्ट्रीच्या लोकांची सर्वात जास्त गरज आहे.

फिल्म इंडस्ट्रीत भित्र्या लोकांचा भरणा

अलीकडेच ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत, अभिनेता शत्रुघ्न सिन्हा बॉलिवूडवर भडकले आहेत. आर्यन खानचे वडील आणि शाहरुख खान यांना मदत करण्याची हीच वेळ आहे, पण गोदी मीडियाच्या भीतीमुळे कोणीही पुढे यायला तयार नाही. फिल्म इंडस्ट्रीत भित्र्या लोकांचा भरणा असल्याचे शत्रुघ्न यांनी म्हटलंय.

म्हणून आर्यनला टारगेट केले जात आहे

जेव्हा शत्रुघ्नला विचारण्यात आले की शाहरुख खानला त्याच्या धर्माच्या नावाखाली घेरले जात आहे का, त्यावर ते म्हणाले की आम्ही असे म्हणू शकत नाही की ही आपत्ती धर्मामुळे त्याच्यावर आली आहे. परंतु काही जणांनी या विषयावर बोलणे सुरू केले आहे. तसे बोलणे योग्य नाही, जो कोणी भारतीय आहे तो भारताचा मुलगा आहे आणि घटनेच्या चौकटीत समान हक्कदार आहे. आर्यन खान हा शाहरुखचा मुलगा असल्यामुळे त्याच्यावर निशाणा साधला जात आहे, असेही शत्रुघ्न म्हणाले.

पूर्वीही असे घडले होते

शत्रुघ्नने इंग्रजी पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत पुढे सांगितले की, या प्रकरणात अडकलेल्या मुनमुन धामेचा आणि अरबाज मर्चंटबद्दल कोणी बोलत नाही. मागच्या वेळी देखील अशा गोष्टी दिसल्या होत्या जेव्हा दीपिका पदुकोणला लक्ष्य करण्यात आले होते. त्या प्रकरणातही अनेक प्रसिध्द नावे असताना दीपिकाची अधिक चर्चा करण्यात आली होती.

एनसीबीच्या भूमिकेवर बोलताना शत्रुघ्न सिन्हा म्हणाले की, आर्यन खान कडून कोणतीही आक्षेपार्ह सामग्री जप्त करण्यात आलेली नाही. ते म्हणाले, "आम्हाला हे देखील माहित आहे की एनसीबीने आर्यन खानकडून कोणतेही ड्रग जप्त केलेले नाहीत किंवा त्याच्याकडे कोणतीही आक्षेपार्ह गोष्ट सापडलेली नाही. जरी त्यांना काही ड्रग मिळाले असतील तर शिक्षा एक वर्षाची आहे, परंतु या प्रकरणात असे होत नाही."

आर्यन खानच्या जामीन अर्जवर आज सुनावणी

आर्यन खानच्या जामीन अर्जावर बुधवारी 13 ऑक्टोबर रोजी मुंबईच्या सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. अलीकडेच न्यायालयाने एनसीबीला 13 ऑक्टोबरपर्यंत उत्तर देण्यास मुदत दिली होती. जर एनसीबीने त्याचे समाधानकारक उत्तर न्यायालयात दाखल केले तर आर्यन खानला तुरुंगात पाठवायचे की जामीन द्यायचा हे न्यायालय ठरवेल.

हेही वाचा - मावळच्या घटनेला सरकार नाही तर भाजपाच जबाबदार होते - शरद पवार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.