ETV Bharat / sitara

शाहिद म्हणतो, मी एखाद्या रोलसाठी परफेक्ट आहे असं मला कधीच वाटत नाही

ट्रेलर पाहून चाहत्यांनी शाहिदच्या या वेगळ्या भूमिकेला पसंती दर्शवत तो या भूमिकेसाठी एक परफेक्ट कलाकार असल्याचे म्हटले आहे. मात्र, मी एखाद्या रोलसाठी परफेक्ट आहे, असं मला आजपर्यंत कधीही वाटलं नसल्याचं शाहिदनं म्हटलं आहे.

शाहिद कपूर
author img

By

Published : Jun 9, 2019, 9:49 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूर लवकरच कबीर सिंग चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. हा चित्रपट दाक्षिणात्य अर्जून रेड्डी चित्रपटाचा हिंदी रिमेक असणार आहे. शाहिदचे चाहते या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. गेल्या काही दिवसांपासूनच ट्रेलरसह चित्रपटातील गाणी प्रदर्शित केली जात आहेत.

हा ट्रेलर पाहून चाहत्यांनी शाहिदच्या या वेगळ्या भूमिकेला पसंती दर्शवत तो या भूमिकेसाठी एक परफेक्ट कलाकार असल्याचे म्हटले आहे. यावर शाहिदने एका माध्यमाशी बोलताना प्रतिक्रिया दिली आहे. आपण कोणत्या रोलसाठी बरोबर किंवा चुकीचे नाही तर तो रोल उत्तम पद्धतीने साकारण्याचा प्रयत्न करत असल्याचे त्याने म्हटले आहे.

मी एखाद्या रोलसाठी परफेक्ट आहे, असं मला आजपर्यंत कधीही वाटलं नसल्याचं शाहिदनं म्हटलं आहे. एखादं पात्र साकारताना कलाकारानं ते वास्तववादी वाटवं याची काळजी घ्यावी, तसंच स्वतःची जमेची आणि कमजोर बाजू ओळखावी असंही त्याने पुढे म्हटले. पुढे शाहिद म्हणाला, की कबीर सिंगचे दिग्दर्शक संदीप मला म्हणाले हा रोल तू चांगल्या पद्धतीने साकारू शकतो आणि त्यांचं हेच मत माझ्यासाठी महत्त्वाचं होतं. कारण, हा अभिनेता चित्रपटातील रोल उत्तम साकारू शकतो, असा विश्वास चित्रपट निर्मात्यांना असणं गरजेचं आहे.

Intro:Body:

ent 

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.