मुंबई: बॉलीवूडचा दबंग अभिनेता सलमान खान (Actor Salman Khan) हा नेहमी कोणत्या कोणत्या कारणाने सतत चर्चेत असतो. आता पुन्हा एका गोष्टीमुळे चर्चेत आला आहे. सुपरस्टार सलमान खान आणि दक्षिणात्य अभिनेत्री प्रज्ञा जायसवाल, गुरु रंधावा (Singer Guru Randhawa)आणि यूलिया वंतूर यांनी गायलेले लव ट्रॅक 'मैं चला' मध्ये दिसून येणार आहेत. हे गाणे सलमान खानच्या चाहत्यांसाठी आनंदाची पर्वणी ठरणार आहे.
सलमान खान म्हणाला (Dabangg actor Salman Khan), मी खुप उत्साहीत आहे. या गाण्यात यूलिया वंतूर सोबत मी स्क्रीन शेअर केली आहे. ती एक अद्भूत कलाकार आहे. तिचे स्वर खुप वेगळे आहेत. त्याचबरोबर मला विश्वास हे गाणे लोकांना नक्की आवडेल. सलमान खान आणि प्रज्ञा जायसवाल अभिनीत या प्रेम गीताचे निर्देशन शबीना खानने केले आहे. तसेच हे शब्बीर अहमदने कंपोज आणि लिहले देखील आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
यूलिया वंतूरने गुरु रंधावा सोबत काम करण्याचा आपल्या अनुभवाबद्दल बोलताना म्हणाली, 'मैं चला' हे एक भावनिक गीत (The song 'Main Chala') आहे. ज्याला खुप प्रेमाने लिहले आहे. आम्ही यामध्ये आमचा जीव लावला आहे आणि मला आशा आहे की, हे लोकांच्या म्हणाला स्पर्श करेल, मी गुरुची आभारी आहे, कारण त्याने माझ्यावर विश्वास दाखवला. तो एक अद्भूत कलाकार आहे.
हेही वाचा : आर्यन खान ड्रग प्रकरणानंतर शाहरुख खान इन्स्टाग्रामवर पुन्हा सक्रिय