ETV Bharat / sitara

६ दिवसात 'साहो'नं पार केला ३०० कोटींचा आकडा - अॅक्शन थ्रिलर

साहो चित्रपट हिंदीसह तमिळ आणि तेलुगू या दाक्षिणात्य भाषांमध्येही प्रदर्शित झाला होता. या तिन्ही व्हर्जनने मिळून केवळ सहा दिवसात ३५० कोटींचा आकडा गाठला आहे.

'साहो'नं पार केला ३०० कोटींचा आकडा
author img

By

Published : Sep 5, 2019, 9:31 PM IST

मुंबई - सुजित यांच्या दिग्दर्शनात तयार झालेला अॅक्शन थ्रिलर सिनेमा साहो ३० ऑगस्टला प्रदर्शित झाला. या सिनेमाला चित्रपट विश्लेषकांच्या संमिश्र प्रतिक्रिया मिळत असतानाच प्रेक्षकांनी मात्र, सिनेमाला अक्षरशः डोक्यावर घेतलं आहे. या सिनेमाची ६ दिवसांची कमाई समोर आली आहे.

हेही वाचा - चित्रपटातील भूमिकेसाठी ताहीर राज भसीनने ओढल्या तब्बल २०० पाकिटे सिगारेट!

प्रभास आणि श्रद्धाच्या मुख्य भूमिका असलेला साहो चित्रपट हिंदीसह तमिळ आणि तेलुगू या दाक्षिणात्य भाषांमध्येही प्रदर्शित झाला. या तिन्ही व्हर्जनने मिळून केवळ सहा दिवसात ३५० कोटींचा आकडा गाठला आहे. तर चित्रपटाच्या हिंदी व्हर्जनने सहा दिवसात १०९.२८ कोटींची कमाई केली आहे.

३५० कोटींच्या बजेटमध्ये तयार झालेल्या या सिनेमासाठी प्रभासनं भरपूर मेहनत घेतली आहे. तब्बल दोन वर्ष या सिनेमाच्या चित्रीकरणासाठी त्याने दिले आहेत. अशात या सिनेमाची बॉक्स ऑफिसवरील वाटचाल पाहता प्रभासच्या मेहनतीचं फळ त्याला मिळत आहे, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

हेही वाचा - Making Video: चॉकलेट बॉयपासून ड्रीम गर्ल बनण्यासाठी आयुष्मानला घ्यावी लागली प्रचंड मेहनत

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.