ETV Bharat / sitara

उरी फेम विकी कौशलचा सर्जिकल स्ट्राईक, कॅटरिना कैफ आणि विकी कौशलची 'एंगेजमेंट'? अफवांना ऊत - कॅटरिना कैफ आणि विकी कौशल प्रेम प्रकरण

अभिनेत्री कॅटरिना कैफ आणि तिचा कथित प्रियकर विकी कौशल यांचा साखरपुडा झाल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे. मात्र कॅटरिनाच्या टीमने ही बातमी खोटे असल्याचे म्हटले आहे.

कॅटरिना कैफ आणि विकी कौशल
कॅटरिना कैफ आणि विकी कौशल
author img

By

Published : Aug 18, 2021, 7:32 PM IST

कॅटरिना कैफ आणि तिचा कथित प्रियकर विकी कौशल यांचा साखरपुडा झाल्याची चर्चा सोशल मीडियावर आहे. इतकेच नाही तर त्यांचा रोका सोहळा होईल व त्यानंतर दोघे विवाह करतील अशीही जोरदार अफवा पसरली आहे. यानंतर दोघांच्याही चाहत्यांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. मात्र कॅटरिनाच्या टीमने ही बातमी खोटे असल्याचे म्हटले आहे.

अलीकडेच अनिल कपूरचा मुलगा हर्षवर्धन कपूरने झूम बाय इनव्हाईट वर खुलासा केला होता की विकी कौशल आणि कॅटरिना कैफ यांच्या प्रेम प्रकरणाची अफवा खरी आहे. मात्र बऱ्याच काळानंतर आता अभिनेत्री कॅटरिनाच्या टीमने स्पष्टीकरण दिले आहे की या अफवांमध्ये कोणतेही तथ्य नाही. सोशल मीडियावरील काही न्यूज पोर्टल्सने दावा केला आहे की कलाकारांचा रोका सोहळा लवकरच होणार आहे आणि लवकरच ते बोहल्यावरही चढतील.

शेरशाह सिनेमाच्या स्क्रिनींगला कॅटरिना कैफ आणि विक्की कौशलची हजेरी

कॅटरिना कैफ आणि विकी कौशल पहिल्यांदा एका टॉक शोच्या सेटवर भेटले. बातम्यांनुसार दोघांनी दोन वेळा भेटल्यानंतर डेटिंग करण्यास सुरुवात केली. ते अनेकदा विविध प्रसंगी एकत्र दिसले होते. अलीकडेच, ते सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणीच्या शेरशाह चित्रपटाच्या स्क्रीनिंगमध्ये एकत्र दिसले. तथापि, चित्रपट संपल्यानंतर ते एकत्र बाहेर पडले नाहीत. विकी प्रथम थिएटरच्या बाहेर आला, कॅटरिनाने बाहेर पडताना तिची बहीण इसाबेला कैफसाठी थांबली व त्या दोघी बाहेर पडल्या.

विकी आणि कॅटच्या प्रकरणाची सुरुवात

त्याचं झालं असं की एका अवॉर्ड फंक्शनमध्ये विकी सूत्रसंचालन करीत होता आणि जेव्हा कॅटरिना स्टेजवर आली तेव्हा तो तिच्याबरोबर ‘फ्लर्ट’ करत होता, ‘आप विकी कौशल जैसे किसी हँडसम इन्सान को पकडॆ शादी क्यूँ नहीं कर लेती?’ वगैरे बोलत. त्यावेळी तिने हे सर्व हसण्यावारी नेले. महत्वाचं म्हणजे कॅटरिना आणि विकी, करण जोहरच्या कंपूतील, जो कंपू वरचेवर पार्टी वगैरे करायला भेटत असतो, मेम्बर होते/आहेत. त्यानंतर दोनेक वर्षांपूर्वी दिवाळीच्या सुमारास विकी आणि कॅटरिना एका चित्रपटाच्या शोनंतर एकत्र दिसले आणि त्यांच्याबद्दल बोलले जाऊ लागले. परंतु त्या दोघांनीही अजूनपर्यंत त्यांच्या रिलेशनशिपबद्दल ब्र देखील काढलेला नाहीये.

काही दिवसांपूर्वी अनिल कपूर सुपुत्र हर्षवर्धन कपूर याने एक शोमध्ये कॅटरिना आणि विकी ‘कपल’ असल्याचे सांगितले आणि तेव्हापासून पुन्हा चर्चांना रंग चढला आहे. विकीने हर्षवर्धनवर नाराजीसुद्धा व्यक्त केली. हे वादळ शमते न शमते तोच कॅटरिनाच्या वाढदिवशी (१६ जुलै) अजून एक बॉम्ब पडला. कॅटरिनाला बॉलिवूडमधील जवळपास सर्वांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या होत्या. सलमान खानने सुद्धा कॅटरिनाला आरोग्यदायी, मानसिक आणि शारीरिक श्रीमंती व भरपूर प्रेमभऱ्या शुभेच्छा दिल्या होत्या, त्यामुळे त्या दोघांची गडद ‘मैत्री’ त्यांच्या फॅन्सना आवडली होती.

विकी आणि कॅटच्या मित्रांकडून मिळाताहेत संकेत

परंतु फॅशन डिझाइनर ऍशले रिबेलोने, जो कॅटरिनाचा घनिष्ट मित्र आहे, कॅटरिनाचा ‘वेडिंग गाऊन’ मधील फोटो टाकत लिहिले, ‘हॅपी बर्थडे कॅटरिना, ‘हे’ लवकरच सत्यात उतरेल’ असा संदेश लिहिला होता. त्यावर कॅटरिना ने सुद्धा ‘थँक यु’ म्हटले होते आणि त्यानंतर कॅटरिनाच्या लग्नाची जोरदार चर्चा सुरु झाली. फिल्म इंडस्ट्रीमधील माहितगारांना कल्पना आहे की कॅटरिना आणि विकी एकमेकांबद्दल ‘सिरीयस’ आहेत आणि कधीही लग्न करू शकतील.

हेही वाचा - 'इम्रान'सोबत कंगना डेट करीत असल्याचा केआरकेचा दावा... म्हणतो, "हा तर लव्ह जिहाद"

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.