हैदराबाद: आज दिग्गज चित्रपट निर्माते आणि कलाकार राज कपूर यांची ९६ वी जयंती. या कार्यक्रमाच्या निमित्ताने त्यांची नात करिश्मा कपूर, करिना कपूर खान, रिद्धिमा कपूर साहनी आणि सून नीतू कपूर यांनी इंस्टाग्रामवर श्रध्दांजली वाहिली आणि त्यांचा आजवर न पाहिलेला एक दुर्मिळ फोटो पोस्ट केला.
राज कपूर, त्यांची पत्नी कृष्णा आणि तिचे वडील रणधीर कपूर यांचा एक ब्लॅक अँड व्हाईट फोटो करिनाने शेअर केला आहे. आपल्या आजोबांची आठवण काढताना करिनाने लिहिलंय, ''तुमच्यासारखा दुसरा होणे नाही. वाढदिवसाच्या शुभेच्छा दादाजी'', असे तिने फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय.
करिनाची मोठी बहीण करिश्मानेसुद्धा इन्स्टाग्रामवर आपल्या आजोबांसोबतचा बालपणाचा एक सुंदर फोटो शेअर केला आणि लिहिले की, "बऱ्याचदा मी माझ्या दादाजींकडून शिकले आहे .. तुमच्या वाढदिवसाला तुमची आठवण येते.''
करिश्माचा चुलत बहिण आणि दिवंगत ऋषी कपूर यांची मुलगी, रिद्धिमा कपूर साहनीने तिच्या इतर भावंडासोबत आपल्या दिवंगत आजोबांच्या मांडीवर बसलेला बालपणातील एक फोटो शेअर केला आहे. या जुन्या फोटोत तिने आजोबांना "मिस यू" म्हटले आहे.
रणधीर कपूरची आई नीतू कपूर यांनी या प्रसंगी त्यांच्या लग्नाचा एक फोटो शेअर केला आहे. त्यात फ्रेममध्ये ऋषी आणि राज कपूर आहेत. या दोघांचीही आठवण येते असे त्यांनी लिहिलंय.
भारतीय सिनेमा आणि करमणुकीच्या इतिहासातील सर्वांत महान व्यक्ती म्हणून राज कपूर ओळखले जातात. बॉलिवूड या महान कलाकारांला कलेतील योगदानाबद्दल १९७१ मध्ये पद्मभूषणने सन्मानित करण्यात आले होते.१९८७ मध्ये त्यांना दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
हेही वाचा -मुंबई विमानळावर जुही चावलाचा 'झूमका गिरा'..!
भारतासह जगातील अनेक देशांमध्ये लोकप्रिय असलेल्या राज कपूर यांनी १९४६ मध्ये कृष्णा कपूर यांच्याशी लग्न केले. या दिवंगत जोडप्याला रणधीर, रिततु, ऋषी, रीमा आणि राजीव कपूर अशी पाच मुले होती. ऋषी आणि रितु यांचे निधन झाले आहे.
हेही वाचा -रणबीर कपूर आणि आलिया भट्ट गोव्याला रवाना