हैदराबाद - आर. माधवनचे एक पोस्टर व्हायरल झाले होते. यात त्याला रतन टाटाच्या भूमिकेत दाखवण्यात आले होते. माधवनच्या चाहत्याने हे पोस्टर तयार केल्याचे समजते. जेव्हा माधवनच्या चाहत्यांनी याबाबत त्याच्याकडे विचारणा केली तेव्हा वेगळेच सत्य पुढे आहे.
माधवनने आपल्या उत्तरात खुलासा करताना म्हटले की ही बातमी अफवा असून यात कोणतेही तथ्य नाही.
ट्विटरवर एका चाहत्याने माधवनला प्रश्न विचारला होता. त्याने लिहिले होते, माधवन, ''तू रतन टाटांची भूमिका साकारणार आहेस का? हे जर घडले तर असंख्य जणांना हे प्रेरणादायी असेल.''
![R Madhavan](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/9871172_tata.jpg)
जेव्हा तर्क वितर्कांना उधाण आल्याचे जेव्हा आर. माधवनच्या लक्षात आले तेव्हा त्याने चाहत्यांना उत्तर दिले की, ''दुर्दैवाने हे खोटे आहे. एका चाहत्याने केवळ तसे एक मनानेच पोस्टर बनवले. अशा प्रकारचा चित्रपट बनणार नसून अशी कोणतीही चर्चा मी केलेली नाही."
हेही वाचा - मुंबई विमानळावर जुही चावलाचा 'झूमका गिरा'..!
अभिनेता आर. माधवन नुकताच प्रदर्शित झालेल्या ‘निशब्धम’ या डिजिटल चित्रपटात दिसला होता. या चित्रपटात अनुष्का शेट्टी, अंजली आणि सुब्बाराजू यांच्याबरोबर हॉलिवूड स्टार मायकेल मॅडसेनसुद्धा एका विशेष भूमिकेत आहे. अमेझॉन प्राइम व्हिडिओवर हा चित्रपट प्रदर्शित झाला.
हेही वाचा - राणा दग्गुबातीच्या वाढदिवसानिमित्य प्रसिध्द झाला 'विराट पर्वम'चा फर्स्ट लूक