मुंबई - गंगा हरजीवनदास काठियावाडी या व्यक्तीच्या जीवनावर आधारित ‘गंगुबाई काठियावाडी’ हा चित्रपट संजय लीला भन्साली बनवत आहेत. एव्हाना चित्रपट प्रदर्शित होऊन गेलाही असता परंतु कोरोनाने सर्वच चित्रपटांची सर्वच वेळापत्रके बदलून टाकली. सध्या या चित्रपटाचे चित्रीकरण सुरु असून नुकताच अजय देवगण चित्रीकरणात सामील झाला. ज्याला गंगुबाई राखी बांधायची अशा करीम लालाची अजय भूमिका साकारत आहे. मुंबईचा रेड लाईट एरिया म्हणून ओळखला जाणारा कामाठीपुरा येथील ‘पिला हाऊस’ येथे गंगुबाईची हयात गेली. तिने तेथील मुलींना मनाविरुद्ध वेश्याव्यवसाय करू दिला नाही. वेश्यांच्या मुलांचे संगोपन व्यवस्थित व्हावे यासाठी तिने चळवळ उभारली तसेच लढाही दिला. याच कामाठीपुरा येथील रहिवाशांनी ‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटाच्या कथानकाबद्दल व त्या प्रदेशाबद्दल उलट सुलट दाखविण्यासाठी आक्षेप घेतला आहे. लेखक, दिग्दर्शक, अभिनेत्री यांच्यावर खटला दाखल केल्याचे सुत्रांकडून समजत आहे. हा चित्रपट हुसेन झैदी यांच्या ‘माफिया क्वीन्स ऑफ मुंबई’वर आधारित आहे.
‘गंगुबाई काठियावाडी’ मधील आलिया भटच्या घरासमोरील आंदोलन मागे! - Alia Bhatt Gangubai Kathiawadi news
‘गंगुबाई काठियावाडी’ चित्रपटासंबंधित सर्वांना तेथील एका सामाजिक संस्थेतर्फे कायदेशीर नोटीस बजावण्यात आली असून, संजय लीला भन्साली, हुसेन झैदी आणि आलीय भट यांच्यावर कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली आहे. याही पुढे जात आलिया भटच्या घरासमोर निदर्शने करण्यात येणार होती. परंतु ही निदर्शने रद्द करण्यात आली असून त्यामागील आणि कायदेशीर नोटिशीसंदर्भातील कारणे कळू शकलेली नाहीत.