ETV Bharat / sitara

अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लरच्या चार मोशन पोस्टरसह 'पृथ्वीराज' नवीन रिलीज तारखेची घोषणा

अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बऱ्याच दिवसांपासून रखडलेल्या 'पृथ्वीराज' चित्रपटाची नवी रिलीज डेट समोर आली आहे. यासोबतच 'पृथ्वीराज'मधील सोनू सूद, संजय दत्त, मानुषी छिल्लर आणि अक्षय कुमार यांचे मोशन पोस्टरही रिलीज करण्यात आले आहे.

'पृथ्वीराज' नवीन रिलीज तारखेची घोषणा
'पृथ्वीराज' नवीन रिलीज तारखेची घोषणा
author img

By

Published : Feb 10, 2022, 7:41 PM IST

मुंबई - अक्षय कुमारच्या चाहत्यांसाठी आणखी एक मोठी बातमी समोर आली आहे. अलीकडेच अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ यांच्या 'बडे मियाँ-छोटे मियाँ' या चित्रपटाची घोषणा झाली आणि त्यांच्या चाहत्यांच्या चेहऱ्यावर हसू उमटले. आता अक्षयच्या चाहत्यांसाठी पुन्हा एक आनंदाची बातमी आहे, कारण अक्षय कुमार आणि मानुषी छिल्लर यांची मुख्य भूमिका असलेल्या 'पृथ्वीराज' या चित्रपटाची नवीन रिलीज डेट समोर आली आहे.

यशराज फिल्म्सने चित्रपटाचे चार भव्य मोशन पोस्टर जारी करून चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. 'पृथ्वीराज'मधून सोनू सूद, संजय दत्त, मानुषी छिल्लर आणि अक्षय कुमार यांचे मोशन पोस्टरही रिलीज करण्यात आले आहे, ज्यामध्ये या स्टार्सचे फर्स्ट लूक रिलीज करण्यात आले आहेत.

  • पराक्रम में अर्जुन, प्रतिज्ञा में भीष्म, ऐसे महान सम्राट पृथ्वीराज चौहान की भूमिका करने का सौभाग्य जीवन मे कभी कभी मिलता है
    A role of a lifetime.Samrat #Prithviraj Chauhan arriving in cinemas on 10th June in Hindi,Tamil & Telugu
    #DrChandraprakashDwivedi @yrf #Prithviraj10thJune pic.twitter.com/D0M2iebCjY

    — Akshay Kumar (@akshaykumar) February 10, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

'पृथ्वीराज' 10 जून 2022 रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. अक्षय कुमारनेही हे चारही मोशन पोस्टर त्याच्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केले आहेत. कोरोना विषाणूमुळे चित्रपटगृहे बंद पडल्यामुळे या वर्षी जानेवारीच्या सुरुवातीला चित्रपट प्रदर्शित होऊ शकला नाही आणि चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आली होती.

आता अक्षयचा पीरियड ड्रामा चित्रपट 'पृथ्वीराज' थिएटरमध्ये दाखल होण्यासाठी सज्ज झाला आहे. चार मोशन पोस्टर्सबद्दल बोलायचे झाले तर संजय दत्तच्या पात्राचे नाव 'काका कान्ह' आहे. त्याचबरोबर मिस वर्ल्ड मानुषी छिल्लर या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. या चित्रपटात ती कन्नौजची राजकन्या संयोगिताची भूमिका साकारणार आहे.

चंद्रप्रकाश द्विवेदी दिग्दर्शित या चित्रपटात अक्षय कुमार पृथ्वीराज चौहान यांच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहे. त्याचबरोबर सोनू सूद पृथ्वीराज चौहान यांचा मित्र आणि राजकवी चांदबरदाई यांच्या भूमिकेत दिसणार आहे.

हेही वाचा - मौनी रॉयच्या हनिमून फोटोंनी काश्मीरचे तापमान वाढवले

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.