ETV Bharat / sitara

‘सर्कस’ च्या सेटवरील वातावरण म्हणजे माझ्यासाठी एक थेरपी - अभिनेत्री पूजा हेगडे - ‘सर्कस’ च्या सेटवर मजामस्ती

पूजा हेगडे ही सध्या भारतातील विविध-भाषिक चित्रपट उद्योगांमधील चित्रपटांत काम करणार्‍या पॅन-इंडिया अभिनेत्रींमध्ये एक व्यस्त अभिनेत्री आहे. ती चारचार भाषांमधील मोठे चित्रपट करीत आहे. तेही मोठ्या हिंदी व दाक्षिणात्य सुपरस्टार्ससोबत. रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सर्कस’ च्या शूटचा अनुभवाबद्दल बोलताना ती बोलत होती.

pooja hegde shere 'cirkus' experience
अभिनेत्री पूजा हेगडे
author img

By

Published : May 30, 2021, 2:02 PM IST

मुंबई - पूजा हेगडे बॉलिवूड आणि टॉलिवूडमधील सर्वाधिक व्यस्त अभिनेत्री आहे. कोरोना काळात नॅशनल लॉकडाऊन उठल्यावर आणि कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे लागलेल्या दुसऱ्या लॉकडाऊन आधी पूजा नॉन-स्टॉप शूट करीत होती. त्याच सुमारास तिने रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सर्कस’ चेसुद्धा शूट केले. ज्यात रणवीर सिंग प्रमुख भूमिकेत आहे. त्या चित्रपटाच्या चित्रीकरणाबाबत सांगताना पूजा हेगडे म्हणाली की, "मला वाटत नाही की एखाद्या चित्रपटाच्या सेटवर मी इतकी हसले असेल. ‘सर्कस’ च्या सेटवरील उर्जा आणि वातावरण अतिशय कमालीचे पॉझिटिव्ह होते. सेटवर हसणं जास्त आणि अधुन मधुन काम चालू आहे असे वाटायचे. माझ्यासाठी तर त्या सेटवर असणेच एक थेरपी होती.”

pooja hegde shere 'cirkus' experience
अभिनेत्री पूजा हेगडे

पूजा हेगडे ही सध्या भारतातील विविध-भाषिक चित्रपट उद्योगांमधील चित्रपटांत काम करणार्‍या पॅन-इंडिया अभिनेत्रींमध्ये एक व्यस्त अभिनेत्री आहे. ती चारचार भाषांमधील मोठे चित्रपट करीत आहे. तेही मोठ्या हिंदी व दाक्षिणात्य सुपरस्टार्ससोबत.

pooja hegde shere 'cirkus' experience
अभिनेत्री पूजा हेगडे

‘सर्कस’ च्या सेटवर हसून माझे गाल दुखत -

पूजा रोहित शेट्टीच्या ‘सर्कस’ मध्ये पहिल्यांदाच रणवीर सिंग सोबत स्क्रीन शेयर करणार आहे. एका अग्रगण्य वृत्तपत्राच्या मुलाखतीत रोहित आणि रणवीरसोबत शुटिंगच्या तिच्या अनुभवाबद्दल बोलताना पूजा म्हणाली की, "मी ‘सर्कस’ च्या सेटवर शूट करायला नाही तर पार्टी करायला आले आहे असे मला सारखे वाटत राहायचे. मला वाटत नाही की मी कुठल्याही चित्रपटाच्या सेटवर इतकी हसले असेन. मी इतकी हसलेय की दिवसाच्या शेवटी माझे गाल आणि जबडा दुखत असे.

pooja hegde shere 'cirkus' experience
अभिनेत्री पूजा हेगडे

मजामस्तीत शूट कसे संपले हे कळलेच नाही -

मला असे सारखे वाटे की पार्टी करता करता शूट सुरु आहे. अर्थातच मी असेही सांगते की सेटवरील सर्वच अत्यंत व्यावसायिकतेने काम करत होते. फक्त टीममधील सर्वजण कुठलेही प्रेशर आमच्यापर्यंत पोहोचू देत नव्हते. आणि याच ‘इक्वेशन’ मुळे मजामस्तीत शूट कसे संपले हे कळलेच नाही.”

pooja hegde shere 'cirkus' experience
अभिनेत्री पूजा हेगडे

काही दिवसांतच पूजा सलमान खान सोबत -

गेल्या वर्षी अनलॉक सुरु झाल्यावर पूजा ‘सर्कस’ च्या मुंबई शेड्युलमध्ये सामील झाली होती. याबरोबरच ती ‘राधे श्याम’ आणि ‘मोस्ट एलिजिबल बॅचलर‘ चे शूटिंग शेड्युलही सांभाळत होती. त्यातच तिच्या खात्यात नवीन चित्रपट ‘आचार्य’ आणि ‘थलपती ६५’ जमा झालेत त्यामुळे तिचे ‘सर्कस’ च्या ऊटी येथील शेड्युलही काट्याच्या शर्यतीवर सुरु होते. आता काही दिवसांतच पूजा सलमान खान सोबतच्या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात करेल.

हेही वाचा - ४ भाषांमधील चित्रपटांत दिमाखात वावरणारी लोकप्रिय अभिनेत्री पूजा हेगडे!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.