ETV Bharat / sitara

'पीएम नरेंद्र मोदी' बायोपिकचं पहिलं गाणं रिलीज, पाहा विवेक ओबेरॉयची खास झलक

पुलवामा हल्ल्यातील विरमरण आलेल्या जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असे त्यांनी एका भाषणादरम्यान म्हटले होते. हेच बोल या गाण्यात ऐकायला मिळतात. अभिनेता विवेक ओबेरॉयचा मोदींच्या भूमिकेतील दमदार अभिनयही या गाण्यात पाहायला मिळतो.

'पीएम नरेंद्र मोदी' बायोपिकचं पहिलं गाणं रिलीज
author img

By

Published : Mar 23, 2019, 8:20 PM IST

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जीवनपट उलगडणारा 'पीएम नरेंद्र मोदी' हा बायोपिक बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. प्रदर्शनापूर्वीच या बायोपिकबाबत वाद निर्माण झाले आहेत. मात्र, हा बायोपिक प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. नुकतंच या बायोपिकमधील 'सौंगध मुझे इस मिट्टी की' हे पहिलं वहिलं गाणं रिलीज झाले आहे.

'सौगंध मुझे इस मिट्टी की' या गाण्यातून शहिदांसाठी अभिवादन करण्यात आले आहे. नरेंद्र मोदींच्या अलिकडील भाषणांच्या संदर्भावरुन हे गाणे तयार करण्यात आले असल्याचे बोलले जात आहे. पुलवामा हल्ल्यातील विरमरण आलेल्या जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असे त्यांनी एका भाषणादरम्यान म्हटले होते. हेच बोल या गाण्यात ऐकायला मिळतात. अभिनेता विवेक ओबेरॉयचा मोदींच्या भूमिकेतील दमदार अभिनयही या गाण्यात पाहायला मिळतो.

प्रसुन जोशी यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. अनेक देशभक्तीवर आधारित गाणी त्यांनी लिहिली आहेत. तर, सुखविंदर सिंग आणि शशी सुमन यांचा स्वरसाज या गाण्याला चढला आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

या गाण्याबाबत चित्रपटाचे निर्माते संदीप सिंग हे एका माध्यमाशी बोलताना म्हणाले होते, की 'हे गाणं प्रत्येक देशवासीयाच्या मनात देशभक्ती जागृत करेल असे आहे. हे गाणं सर्व वीरमरण आलेल्या जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी तयार करण्यात आले आहे'.

'पीएम नरेंद्र मोदी' बायोपिकचे दिग्दर्शन ओमंग कुमार यांनी केले आहे. 'सरबजीत' आणि 'मेरी कोम' या गाजलेल्या बायोपिकचे दिग्दर्शनही त्यांनीच केले होते. ५ एप्रिल रोजी 'पीएम नरेंद्र मोदी' बायोपिक प्रदर्शित होणार आहे.

Intro:Body:

'पीएम नरेंद्र मोदी' बायोपिकचं पहिलं गाणं रिलीज, पाहा विवेक ओबेरॉयची खास झलक

मुंबई - पंतप्रधान नरेंद्र मोदींचा जीवनपट उलगडणारा 'पीएम नरेंद्र मोदी' हा बायोपिक बऱ्याच काळापासून चर्चेत आहे. प्रदर्शनापूर्वीच या बायोपिकबाबत वाद निर्माण झाले आहेत. मात्र, हा बायोपिक प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. नुकतंच या बायोपिकमधील 'सौंगध मुझे इस मिट्टी की' हे पहिलं वहिलं गाणं रिलीज झाले आहे.

'सौगंध मुझे इस मिट्टी की' या गाण्यातून शहिदांसाठी अभिवादन करण्यात आले आहे. नरेंद्र मोदींच्या अलिकडील भाषणांच्या संदर्भावरुन हे गाणे तयार करण्यात आले असल्याचे बोलले जात आहे. पुलवामा हल्ल्यात वीरमरण आलेल्या जवानांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही, असे त्यांनी एका भाषणादरम्यान म्हटले होते. हेच बोल या गाण्यात ऐकायला मिळतात. अभिनेता विवेक ओबेरॉयचा मोदींच्या भूमिकेतील दमदार अभिनयही या गाण्यात पाहायला मिळतो.

प्रसून जोशी यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. अनेक देशभक्तीवर आधारित गाणी त्यांनी लिहिली आहेत. तर, सुखविंदर सिंग आणि शशी सुमन यांचा स्वरसाज या गाण्याला चढला आहे.

या गाण्याबाबत चित्रपटाचे निर्माते संदीप सिंग हे एका माध्यमाशी बोलताना म्हणाले होते की, 'हे गाणं प्रत्येक देशवासीयाच्या मनात देशभक्ती जागृत करेल असे आहे. हे गाणं सर्व शहिद जवान आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी तयार करण्यात आले आहे'.

'पीएम नरेंद्र मोदी' बायोपिकचे दिग्दर्शन ओमंग कुमार यांनी केले आहे. 'सरबजीत' आणि 'मेरी कोम' या गाजलेल्या बायोपिकचे दिग्दर्शनही त्यांनीच केले होते. ५ एप्रिल रोजी 'पीएम नरेंद्र मोदी' बायोपिक प्रदर्शित होणार आहे.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.