ETV Bharat / sitara

नव्या नवेली नंदाने 'सर्व गुन्ह्यातील भागीदार' म्हणत अभिषेक बच्चनला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा!! - अभिषेक बच्चनचा ४५ वा वाढदिवस

आज आपला वाढदिवस साजरा करणाऱ्या अभिनेता अभिषेक बच्चन याला त्याची भाची नव्या नवेली नंदाकडून वाढदिवसाच्या शुभेच्छा मिळाल्या आहेत. मामासोबतचा एक जुना फोटो शेअर करीत नव्याने 'सर्व गुन्ह्यातील भागीदार' असे म्हणत ज्युनियर बच्चनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

abhishek bachchan birthday
अभिषेक बच्चनला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
author img

By

Published : Feb 5, 2021, 12:33 PM IST

मुंबई - अभिनेता अभिषेक बच्चन आज त्याचा ४५ वा वाढदिवस साजरा करीत आहे. बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रिटींकडून त्याला हार्दिक शुभेच्छा मिळत असून त्या सर्वांमध्ये सर्वात गोड वाढदिवसाची पोस्ट त्याची भाची नव्या नवेली नंदाने इन्स्टाग्रामवर शेअर केली आहे.

अलिकडेच आपले इन्स्टाग्राम खाते पब्लिक केलेल्या मव्या नवेलीने अभिषेक मामाला शुभेच्छा दिल्या आहेत. मामासोबतचा एक जुना फोटो शेअर करीत नव्याने 'सर्व गुन्ह्यातील भागीदार' असे म्हणत ज्युनियर बच्चनला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Navya Naveli Nanda wishes
नव्या नवेली नंदाने दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा

अमिताभ बच्चन यांनीसुद्धा सोशल मीडियावर थ्रोबॅक पिक्चर्सच्या कोलाजसह अभिषेकला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. बच्चन यांनी लिहिलंय, "मी त्याचे एकदाच नेतृत्व केले होते...त्याचा हात हातात धरुन..तो आता माझे नेतृत्व करतोय माझा हात हातात धरुन."

कॅटरिना कैफनेही अभिषेकला इन्स्टाग्राम स्टोरीजवरुन शुभेच्छा दिल्या आहेत.

abhishek bachchan birthday
कॅटरिनाने दिल्या शुभेच्छा

अभिषेक बच्चन याच्या कारकिर्दीला पुन्हा उभारी मिळाली असून अलिकडेच 'ब्रिद' वेब सिरीजच्या दुसऱ्या भागात तो झळकला होता. त्याच्या हातामध्ये आता 'बिग बुल' आणि 'बॉब बिस्वास' हे चित्रपट आहेत.

हेही वाचा - ‘द गर्ल ऑन द ट्रेन’ मधील भूमिकेसाठी परिणीती चोप्राने वापरल्या स्वआयुष्यातील वाईट आठवणी

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.