ETV Bharat / sitara

Nagraj Manjule Jhund : नागराज मंजुळेचा 'झुंड' अखेर ४ मार्च रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार

author img

By

Published : Feb 2, 2022, 11:41 AM IST

बहुप्रतीक्षित झुंड हा चित्रपट ( Jhund will finally be released ) अखेर ४ मार्च २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असल्याची माहिती अमिताभ बच्चन यांनी दिली आहे. नागराज मंजुळे यांनीही आपल्या फेसबुकवरुन ही माहिती पोस्ट केली आहे.

नागराज मंजुळेचा 'झुंड
नागराज मंजुळेचा 'झुंड

मुंबई - बहुप्रतीक्षित झुंड हा चित्रपट ( Jhund will finally be released ) अखेर ४ मार्च २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असल्याची माहिती अमिताभ बच्चन यांनी दिली आहे. आज त्यांनी आपल्या ट्विटरवरुन ही घोषणा केली. या चित्रपटाचे दिग्दर्शन सैराटचे दिग्दर्शक नागराज मंजुळे ( Nagraj Manjule film Jhund ) यांनी केले आहे. मंजुळे यांनीही आपल्या पेसबुकवरुन ही माहिती पोस्ट केली आहे.

अमिताभ यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय," इस टोली से मुकाबला करने के लिए रहो तैयार. हमारी टीम आ रही है. झुंड चित्रपट ४ मार्च रोजी तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात."

T 4178 - Iss toli se muqaabla karne ke liye raho taiyaar! Humari team aa rahi hai ⚽🥅 #Jhund releasing on 4th Mar 2022 in cinemas near you.@Nagrajmanjule #BhushanKumar #KrishanKumar #RaajHiremath #SavitaRajHiremath @AjayAtulOnline @TSeries @tandavfilms @aatpaat @ZeeStudios_ pic.twitter.com/EtNUZJFA1c

— Amitabh Bachchan (@SrBachchan) February 2, 2022

झुंड चित्रपटाची कथा स्लम फुटबॉल लिगची ( Jhund movie based on Slum Football League ) आहे. झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना फुटबॉलचे धडे शिकवत त्यांना व्यसनापासून बाजूला नेणाऱ्या एका कतृत्ववान कोचची आहे. विजय बारसे यांच्या खऱ्या आयुष्यावर बेतलेली ही कथा आहे. ही मध्यवर्ती भूमिका अमिताभ बच्चन साकारत आहेत.

या चित्रपटातील इतर कलाकार हे खरोखर झोपडपट्टीत राहणारे फुटबॉल खेळाडू आहेत. सैराट फेम आकाश ठोसर आणि रिंकु राजगुरुचीदेखील यात महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

नागराज मंजुळे या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण (Nagraj Manjule Bollywood debut ) करीत आहेत. अमिताभसोबत काम करण्याचे त्यांचे स्वप्न होते. झुंडच्या माध्यमातून ते आता पूर्ण होतंय. झुंडच्या टीझर आणि ट्रेलरची आता प्रेक्षकांना प्रतीक्षा लागून राहिली आहे.

हेही वाचा - Shamita Shetty Birthday: राकेश बापटने शेअर केला आकर्षक फोटो, शिल्पा शेट्टीने केला प्रेमाचा वर्षाव

मुंबई - बहुप्रतीक्षित झुंड हा चित्रपट ( Jhund will finally be released ) अखेर ४ मार्च २०२२ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार असल्याची माहिती अमिताभ बच्चन यांनी दिली आहे. आज त्यांनी आपल्या ट्विटरवरुन ही घोषणा केली. या चित्रपटाचे दिग्दर्शन सैराटचे दिग्दर्शक नागराज मंजुळे ( Nagraj Manjule film Jhund ) यांनी केले आहे. मंजुळे यांनीही आपल्या पेसबुकवरुन ही माहिती पोस्ट केली आहे.

अमिताभ यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय," इस टोली से मुकाबला करने के लिए रहो तैयार. हमारी टीम आ रही है. झुंड चित्रपट ४ मार्च रोजी तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात."

झुंड चित्रपटाची कथा स्लम फुटबॉल लिगची ( Jhund movie based on Slum Football League ) आहे. झोपडपट्टीत राहणाऱ्या मुलांना फुटबॉलचे धडे शिकवत त्यांना व्यसनापासून बाजूला नेणाऱ्या एका कतृत्ववान कोचची आहे. विजय बारसे यांच्या खऱ्या आयुष्यावर बेतलेली ही कथा आहे. ही मध्यवर्ती भूमिका अमिताभ बच्चन साकारत आहेत.

या चित्रपटातील इतर कलाकार हे खरोखर झोपडपट्टीत राहणारे फुटबॉल खेळाडू आहेत. सैराट फेम आकाश ठोसर आणि रिंकु राजगुरुचीदेखील यात महत्त्वपूर्ण भूमिका आहे.

नागराज मंजुळे या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण (Nagraj Manjule Bollywood debut ) करीत आहेत. अमिताभसोबत काम करण्याचे त्यांचे स्वप्न होते. झुंडच्या माध्यमातून ते आता पूर्ण होतंय. झुंडच्या टीझर आणि ट्रेलरची आता प्रेक्षकांना प्रतीक्षा लागून राहिली आहे.

हेही वाचा - Shamita Shetty Birthday: राकेश बापटने शेअर केला आकर्षक फोटो, शिल्पा शेट्टीने केला प्रेमाचा वर्षाव

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.