मुंबई - मलायका अरोरा आजकाल तिचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरसोबत मालादीवमध्ये व्हेकेशन एन्जॉय करत आहे. तिथून अभिनेत्री तिच्या चाहत्यांसाठी व्हिडिओ आणि फोटो शेअर करत आहे. चाहत्यांनाही अभिनेत्रीचे फोटो आणि व्हिडिओ खूप आवडतात. नुकताच अभिनेत्रीचा बॉयफ्रेंड अर्जुन कपूरने त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये मलायका अरोरा सायकलिंगचा आनंद लुटताना दिसत आहे.
मलायका अरोराचा हा ब्लॅक अँड व्हाईट व्हिडिओ मालदीवचा आहे. व्हिडिओमध्ये मलायका ग्लॅमरस स्टाईलमध्ये सायकल चालवताना दिसत आहे. खरं तर, मलायका सायकल चालवताच थोड्याच अंतरावर शटर येते आणि अभिनेत्री ब्रेक लावून सायकलवरून उतरते. यानंतर मलायका खूप क्यूट रिअॅक्शन देते. मलायकाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच लाइक होत असून त्यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया येत आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
एका सोशल मीडिया युजरने मलायकाच्या व्हिडिओचे क्यूट असे वर्णन केले आहे, तर दुसर्याने लिहिले आहे की, आधी सायकल चालवायला शिका, मॅडम. अशा प्रकारे लोक या पोस्टवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.
अलीकडेच मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांचे ब्रेकअप झाल्याच्या बातम्या येत होत्या. पण या सुट्टीतील फोटोंनी या अफवेचे खंडन केले आहे. मलायका अरोरा आणि अर्जुन कपूर यांच्या वयात १२ वर्षांचे अंतर आहे. मात्र, त्यानंतरही दोघांमध्ये छान बॉन्डिंग आहे.
पर्सनल लाईफबद्दल बोलायचे झाले तर ही अभिनेत्री मलायका अरोरा सध्या बॉलिवूड अभिनेता अर्जुन कपूरला डेट करत आहे. दोघेही अनेकदा सोशल मीडियावर आपले प्रेम व्यक्त करतात.
हेही वाचा - सारा अली खानने माधुरी दीक्षितसोबत केला 'चका चक' डान्स, पाहा व्हिडिओ