ETV Bharat / sitara

महेश मांजरेकर 'कॅन्समुक्त', अंतिमच्या शूटिंगवेळी केली होती केमोथेरपी - mahesh manjrekar at antim trailer launch

मूत्राशयाच्या कर्करोगावर शस्त्रक्रिया झालेल्या महेश मांजरेकर यांनी आपण आता कर्करोगमुक्त असल्याचे सांगितले आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या अंतिम सिनेमाच्या ट्रेलर लॉन्च प्रसंगी मांजरेकर बोलत होते. त्यांच्या केमोथेरेपी दरम्यान अंतिम सिनेमाचे शूटिंग त्यांनी केल्याचाही खुलासा केला.

महेश मांजरेकर
महेश मांजरेकर
author img

By

Published : Oct 26, 2021, 8:36 PM IST

मुंबई - निर्माता दिग्दर्शक महेश मांजरेकर यांनी आपल्यावर मूत्राशयाच्या कर्करोगावर शस्त्रक्रिया झाली असून आता कर्करोगमुक्त झालो असल्याचे म्हटले आहे. 63 वर्षीय मांजरेकर यांनी सांगितले की, सलमान खान आणि आयुष शर्मा यांच्या भूमिका असलेल्या 'अंतिम म: द फायनल ट्रुथ' या चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना कर्करोगाचे निदान झाले होते.

"अंतिमच्या शूटिंग दरम्यान, माझे कर्करोगाचे निदान झाले, त्यावेळी चित्रपटाचा शेवटचा भाग शूट करीत होतो आणि त्यानंतर मी केमोथेरपी घेतली. आज मला तुम्हा सर्वांना सांगताना आनंद होत आहे की मी कर्करोगमुक्त आहे," असे मांजरेकर यांनी पत्रकारांना सांगितले.

अंतिम चित्रपटाच्या ट्रेलर लाँचच्या वेळी दिग्दर्शक महेश मांजरेकर बोलत होते. यावेळी सलमान खान आणि त्याचा मेहुणा आयुष शर्मा उपस्थित होता.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

केमोथेरपी सुरू असताना चित्रपटाचे चित्रीकरण करणे कठीण होते का, असे विचारले असता, मांजरेकर म्हणाले की, या प्रक्रियेचा त्यांच्यावर फारसा परिणाम झाला नाही हे भाग्यच आहे. "मोठ्या शस्त्रक्रियेसाठी जाण्यापूर्वी मला प्रथम केमोथेरपी घ्यावी लागली. शूटिंगदरम्यान, मी केमोथेरपीखाली होतो पण त्याचा माझ्यावर फारसा परिणाम झाला नाही. मला हे जाणवले की तुमचे आवडते काम तुम्हाला प्रेरित करते. मी नेहमी सकारात्मक विचार करतो."

"जेव्हा मला कर्करोग झाल्याचे सांगण्यात आले तेव्हा मला धक्का बसला नाही. मी ते स्वीकारले. असे बरेच लोक आहेत ज्यांना कर्करोग होतो, (परंतु) ते लढतात आणि जगतात. त्यामुळे मला त्याचा फारसा त्रास झाला नाही. सर्व टीम काळजी घेत होती आणि मदत करत होती, कोणतीही अडचण नव्हती. मी खूप आरामात होतो. ते दोघे (सलमान, आयुष) खूप सपोर्टिव्ह होते," मांजरेकर पुढे म्हणाले.

महेश मांजरेकर
महेश मांजरेकर

अंतिम चित्रपट हा दोन टोकाच्या विचारांच्या लोकांची गोष्ट आहे. ही एक "दोन शक्तिशाली पुरुषांची आकर्षक कथा" आहे. यात एक पोलीस आहे तर दुसरा गुंड. या भूमिका अनुक्रमे सलमान आणि आयुष शर्माने केल्या आहेत.

'अंतिम' या चित्रपटात महेश मांजरेकरांनीही एक छोटी भूमिका साकारली आहे. आपण दिग्दर्शन करीत असलेल्या सिनेमात महेश मांजरेकर सहसा भूमिका करीत नाहीत. मात्र सलमानच्या इच्छेखातर त्यांनी यात भूमिका केली आहे. सलमानसोबत यापूर्वी मांजरेकर यांनी वॉन्टेड (2009), दबंग (2010) आणि दबंग 3 (2019) सारख्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे.

26 नोव्हेंबर रोजी 'अंतिम 'जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे. हा चित्रपट झी स्टुडिओद्वारे जागतिक स्तरावर वितरित केला जाईल.

हेही वाचा - सलमान खानने उघडले ‘सिंगल स्क्रीन’ थिएटरचे शटर!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.