ETV Bharat / sitara

Madhuri Dixit on OTT : 'द फेम गेम'मध्ये बॉलिवूड आयकॉनच्या भूमिकेत माधुरी दीक्षित - द फेम गेम मालिकेत माधुरी दीक्षित

माधुरी दीक्षित नेने नेटफ्लिक्सच्या आगामी 'द फेम गेम' या मालिकेतून ओटीटीवर पदार्पण करणार आहे. या मालिकेत ती अनामिका आनंद ही बॉलिवूड आयकॉनची भूमिका साकारणार आहे. या व्यक्तीरेखेबद्दल माधुरीने सांगितले आहे.

माधुरी दीक्षित नेने
माधुरी दीक्षित नेने
author img

By

Published : Feb 11, 2022, 2:57 PM IST

मुंबई (महाराष्ट्र) - अभिनेत्री माधुरी दीक्षित नेने नेटफ्लिक्सच्या आगामी 'द फेम गेम' या मालिकेतून ओटीटीवर पदार्पण करणार आहे. करण जोहर-समर्थित या मालिकेत माधुरीला अनामिका आनंद या बॉलिवूड आयकॉनच्या भूमिकेत दाखवण्यात आले आहे. शोच्या व्हर्च्युअल ट्रेलर लाँच दरम्यान माधुरीने सांगितले की तिला या मालिकेचा आधार वाटला आणि ती लगेचच तिच्या जगाकडे आकर्षित झाली.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

"मला स्क्रिप्ट आवडली. यातील मी साकारत असलेल्या व्यक्तीरेखेचा प्रवास खूप आवडला. जेव्हा तुमच्या आयुष्यात प्रसिद्धी येते तेव्हा कोणत्या तरी चुकीच्या गोष्टी आणि गुंतागुंती होऊ शकतात. ही एक अशा महिलेची कथा आहे जिचे आयुष्य वरवर परिपूर्ण दिसते. एके दिवशी ती गायब होते आणि सर्वांना आश्चर्य वाटते. तिला काय झाले, ती कुठे आहे? असा प्रश्न सर्वांना पडतो.

"मग, 'ती कुठे आहे?' बदलून 'ती कोण आहे?' ती कोण आहे हे लोकांना ठाऊक आहे का? ती स्वतःला ओळखते का? कारण सर्वांनी तिला पडद्यावर पाहिले आहे, लार्जर दॅन लाइफ पती आणि मुलांसह परिपूर्ण जीवन जगत आहे. ती तिच्या व्यवसायात पूर्णपणे स्थिर होती. मग काय? तिच्यासोबत काय घडलं? मला वाटलं की हे खूप वेधक आहे. त्यामुळे मला खूप आकर्षण वाटलं," असं मालिकेच्या कथेबद्दल सांगताना माधुरी म्हणाली.

चित्रपट निर्माते श्री राव द फेम गेमचे शोरनर आणि लेखक आहेत. बेजॉय नांबियार आणि करिश्मा कोहली हे दिग्दर्शक म्हणून काम करीत आहेत. या मालिकेत संजय कपूर, मानव कौल, लक्षवीर सरन, सुहासिनी मुळे आणि मुस्कान जाफेरी यांच्याही भूमिका आहेत.

माधुरीच्या म्हणण्यानुसार तिच्यात आणि ती साकारत असलेल्या अनामिका या पात्रात एकच साम्य आहे की त्या दोघीही फिल्म स्टार आहेत. करण जोहर, अपूर्व मेहता, सोमेन मिश्रा आणि धर्माटिक एंटरटेनमेंट निर्मित 'द फेम गेम' 25 फेब्रुवारी रोजी नेटफ्लिक्सवर प्रीमियर होईल.

हेही वाचा - Oscar Nominations 2022 : ऑस्कर २०२२ साठी सर्वोत्कृष्ट चित्रपट श्रेणीसाठी निवड झालेले १० चित्रपट

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.