मुंबई - आपलं सौंदर्य, नृत्य आणि हास्याने लाखो प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या धकधक गर्लचा आज ५३वा वाढदिवस. सध्या लॉकडाऊनचा खाळ सुरू असल्यामुळे कलाकार घरी अडकून आहेत. शूटिंगही थांबली आहेत. परंतु धकधक गर्ल माधुरीला शुभेच्छा देण्यासाठी फिल्म इंडस्ट्री एकवटली आहे. यामध्ये अभिनेत्री शिल्प शेट्टी, अभिषेक बच्चन आणि शत्रुघ्न सिन्हा यांच्या नावाचा समावेश आहे.
-
Many happy returns of the day to an attractive, charming dignified actress @MadhuriDixit. She has won us all with her most endearing smile in different genres of films in a career spanning almost 3 decades. She is one of the most versatile & talented actresses we have. She is
— Shatrughan Sinha (@ShatruganSinha) May 15, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Many happy returns of the day to an attractive, charming dignified actress @MadhuriDixit. She has won us all with her most endearing smile in different genres of films in a career spanning almost 3 decades. She is one of the most versatile & talented actresses we have. She is
— Shatrughan Sinha (@ShatruganSinha) May 15, 2020Many happy returns of the day to an attractive, charming dignified actress @MadhuriDixit. She has won us all with her most endearing smile in different genres of films in a career spanning almost 3 decades. She is one of the most versatile & talented actresses we have. She is
— Shatrughan Sinha (@ShatruganSinha) May 15, 2020
शत्रुघ्न सिन्हा यांनी आपल्या ट्विटमध्ये लिहिलंय, 'आकर्षक, चार्मिंग आणि बेहतरीन अभिनेत्री @MadhuriDixit हिला जन्म दिन मुबारक.'
अभिषेक बच्चनने माधुरीला जन्मदिनाच्या शुभेच्छा देताना लिहिलंय, जन्मदिनाच्या शुभेच्छा माधुरीजी. खूप प्रेम आणि आदर.
शिल्पा शेट्टीने इन्स्टाग्राम स्टोरीवर एक सुंदर फोटो शेअर केला आहे.
माधुरीचा जन्म १५ मे १९६७ ला महाराष्ट्रात झाला. माधुरीला मायक्रोबायोलॉजिस्ट बनायचे होते. यासाठी तिने मायक्रोबायोलॉजीची डिग्रीदेखील घेतली आहे. नृत्य हा माधुरीचा लहानपणापासूनचा छंद आहे. तिने अवघ्या ३ वर्षांच्या वयात कथ्थक नृत्य शिकण्यास सुरूवात केली होती. यामुळेच पुढे ती एक प्रोफेशनल कथ्थक डान्सर म्हणून ओळखली जावू लागली.
माधुरीचा १९८४मध्ये आलेला 'अबोध' हा पहिलाच चित्रपट फ्लॉप ठरला होता. यानंतर तिचे 'स्वाती', 'हिफाजत', 'दयावान' आणि 'खतरों के खिलाडी'सारखे अनेक चित्रपट फ्लॉप ठरले. मात्र, १९८८ मध्ये आलेल्या 'तेजाब' चित्रपटाने तिला खऱ्या अर्थाने लोकप्रियतेचे शिखर गाठण्यास मदत केली. या चित्रपटातील 'एक दो तीन' गाणं तर आजही अनेकांच्या ओठी आहे.गाण्यासाठी
माधुरीने 'देवदास' चित्रपटातील 'काहे छेडे मोहे' गाण्यासाठी ३० किलोचा घागरा घातला होता. विशेष म्हणजे ३० किलोच्या या ड्रेसमध्ये माधुरीने डान्सदेखील केला होता. हा ड्रेस डिझायनर निता लुल्ला यांनी डिझाईन केला होता.
आपल्या करिअरच्या उंचावणाऱ्या आलेखादरम्यान माधुरी सर्वाधिक मानधन घेणारी अभिनेत्री होती. 'हम आपके हैं कौन' चित्रपटासाठी तिने तब्बल २.७ कोटी इतके मानधन घेतले होते.