मुंबई - अमिताभ यांची लाडकी नात नव्या नवेली ग्रॅज्यूएट झाली आहे. ही बातमी समजताच संपूर्ण बच्चन परिवाराने आनंद उत्सव साजरा केला आहे. अमिताभने आपल्या नातीचा एक स्लोमोशनमधील व्हिडिओ पोस्ट केला आहे. सध्या सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे न्यूयॉर्कला पोहोचू शकत नसल्यामुळे बच्चन कुटुंबियांनी घरीच हा आनंद साजरा केला. अमिताभ यांची ही पोस्ट सध्या खूप चर्चेत आहे. असंख्य लोकांना यावर प्रतिक्रियांचा वर्षाव केला आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
अमिताभ यांनी नात नव्या नवेलीला शुभेच्छा देताना लिहिलंय, ''तरुण विद्यार्थ्याच्या आयुष्यातील खास दिवस, ग्रॅज्यूएशन डे. ती न्यूयॉर्कच्या कॉलेजमधून ग्रॅज्यूएट झाली आहे. कोरोना आणि लॉकडाऊनच्या कारणामुळे समारंभ रद्द करण्यात आलाय. त्यामुळे ती जाऊ शकली नाही. नाहीतर आम्ही सर्वांनी तिच्यासोबत जाण्याचा प्लान तयार केला होता. असे असले तरी तिला ग्रॅज्यूएशन गाऊन आणि कॅप घालायची नव्याने आपल्या घरी जलसामध्ये परिधान करुन आपला आनंद व्यक्त केला. तुझा अभिमान आहे नव्या, भगवान तुला आशिर्वाद देओ.''
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
अमिताभ यांनी व्हिडिओसह नव्यासोबतचा फोटोही शेअर केला आहे. यात त्यांची मुलगी श्वेता दिसत आहे. हा फोटो शेअर करीत अमिताभ यांनी लिहिलंय, ''श्वेताचे भाव जयाच्या चेहऱ्यावरील भाव दर्शवत आहेत आणि नव्याचे भाव श्वेताच्या चेहऱ्यावरील भाव दर्शवत आहेत, जेव्हा ती तरुण होती.''
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
अमिताभ यांचा हा कौटुंबिक आनंद सोहळा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरलाय. अमिताभ बच्चन नेहमीच कौटुंबिक आनंदाचे छोटे छोटे प्रसंग नेहमी लोकांसमोर शेअर करीत असतात.