दिल्ली - दिल्ली शीख गुरुद्वारा प्रबंधक समितीने (डीएसजीएमसी) बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौत हिला केंद्राच्या कृषी विधेयकाचा निषेध नोंदविणार्या शेतकरी आणि कार्यकर्त्यांविरूद्ध केलेल्या 'अपमानकारक' ट्विटबद्दल बिनशर्त माफी मागण्यासाठी कायदेशीर नोटीस पाठविली आहे. शुक्रवारी समितीच्या अध्यक्षांनी ही माहिती दिली.
डीएसजीएमसीचे अध्यक्ष मनजिंदरसिंग सिरसा यांनी शुक्रवारी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, “कंगना रणौतला तिच्या अपमानास्पद ट्विटबद्दल आम्ही कायदेशीर नोटीस पाठविली आहे. कंगनाने एका शेतकर्याच्या वृद्ध आईला १०० रूपयांत उपलब्ध होणारी स्त्री म्हणून हिणवले आहे. तिने केलेल्या ट्विटमध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलन देशविरोधी असल्याचे वर्णन करण्यात आले आहे. कंगनाने असंवेदनशील भाष्य केल्याबद्दल आम्ही शेतकर्यांकडून बिनशर्त माफी मागण्याची मागणी करतो.
'शाहिन बाग वाली दादी' राष्ट्रीय राजधानीतील विविध सीमारेषांवर नवीन शेतीविषयक कायद्याच्या विरोधात झालेल्या शेतकरी आंदोलनात सामील झाल्याचा आरोप करणार्या कंगनाच्या ट्वीटच्या पार्श्वभूमीवर ही नोटिस देण्यात आली आहे.
हेही वाचा - कंगना राणावतचे ट्विटर अकाउंट बंद करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल
बिलकिस बानोसह दुसर्या वृद्ध महिलेच्या फोटोसह कंगना रणौतने ही पोस्ट रीट्वीट केली आणि लिहिले की टाइम मासिकामध्ये दिसणारी तीच आजी '१००रुपयांना उपलब्ध' होती.
आपल्या ट्विटमध्ये त्यांनी लिहिले आहे, "हा ही तीच दादी, जी टाईम मासिकामध्ये सर्वात शक्तिशाली भारतीय बनली होती आणि ती १०० मध्ये उपलब्ध असते. पाकिस्तानी पत्रकाराने भारतासाठी आंतरराष्ट्रीय पीआर हायजॅक केला आहे. आपल्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर आमच्यासाठी बोलण्यासाठी आपल्या लोकांची आवश्यकता आहे.''
गुरुवारी कंगना रणौत आणि पंजाबी अभिनेता-गायक दिलजीत दोसंझ यांच्यातही या विषयावर ट्विटर युध्द पाहायला मिळाले होते.
हेही वाचा - कृषी कायद्याचा विरोध करत काँग्रेसने जाळले नरेंद्र मोदींचे फलक; कायदा रद्द करण्याची मागणी
विशेष म्हणजे, केंद्राचे तीन नवीन कृषी कायदे रद्द करावे या मागणीसाठी हजारो शेतकरी एका आठवड्यापासून दिल्लीच्या सीमेवर आंदोलन करत आहेत.
हा प्रश्न सोडविण्यासाठी सरकारने गुरुवारी शेतकरी नेत्यांशी चवथी फेरी पार पडली. तथापि, चर्चा पुन्हा एकदा अनिर्णीत राहिली आहे. चर्चेची पुढील फेरी शनिवारी होणार आहे.