मुंबई - 'छावा' चित्रपटानं अवघ्या तीन दिवसांत बॉक्स ऑफिसवर 100 कोटींचा टप्पा ओलांडला. या चित्रपटानं 116 कोटी रुपये कमावून बॉक्स ऑफिसवर खळबळ उडवून दिली. या चित्रपटाचा क्लायमॅक्स सर्वांना भावूक करणारा आहे. अलीकडेच, विकी कौशलनं इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे, यामध्ये एक मुलगा 'छावा'च्या पोस्टरवर दुध चढवताना दिसत आहे. विकी कौशलनं सोशल मीडियावर व्हिडिओ शेअर करत यावर लिहिलं, 'छत्रपती संभाजी महाराज की जय !' आता या पोस्टवर अनेकजण आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. अनेकजण कमेंट्स देऊन छत्रपती संभाजी महाराज यांचा जय जयकार करत आहे.
विकी कौशलनं शेअर केला व्हिडिओ : तसेच काही वेळापूर्वी विकीनं आणखी एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये एक छोटा मुलगा छत्रपती संभाजी महाराज यांचा जय जयकार करत भावूक होताना दिसत आहे. दरम्यान या पोस्टवर विकानं लिहिलं, 'आमची सर्वात मोठी कमाई! बेटा, तुझा अभिमान आहे... तुला मिठी मारता आली असती तर बरे होईल. तुमच्या प्रेमाबद्दल आणि भावनांबद्दल सर्वांचे आभार. शंभू राजेंची कहाणी जगातील प्रत्येक घरात पोहोचावी अशी आमची इच्छा होती आणि हे घडताना पाहणे, हा आमचा सर्वात मोठा विजय आहे. चित्रपटगृहात छावा.' याशिवाय आता अनेकजण या पोस्टच्या कमेंट विभागात आपल्या प्रतिक्रिया देऊन या मुलाचं कौतुक करताना दिसत आहेत.
'छावा'चं सर्वत्र कौतुक : या व्हिडिओच्या पोस्टमध्ये एका चाहत्यानं लिहिलं, 'खरंच शेवट खूप वेदनादायी होता.' दुसऱ्या एकानं लिहिलं, 'छावा' हा चित्रपट खूप जबरदस्त आहे.' आणखी एकानं लिहिलं, 'चित्रपटावरून समजत आहे की, छत्रपती संभाजी महाराज यांना किती वेदना झाल्या असेल.' 'छावा'नं पहिल्या आठवड्यात 116 कोटी रुपये कमावले. या चित्रपटाची सुरुवात 33.1 कोटींच्या कलेक्शननं झाली. दुसऱ्या दिवशी या चित्रपटानं 39.3 कोटींची कमाई केली. रविवारी चित्रपटाच्या कमाईत मोठी वाढ झाली. या चित्रपटानं 48.5 कोटी रुपये कमावले. आता त्याची खरी परीक्षा सोमवारी होईल.
हेही वाचा :