मुंबई - 'हिरोपंती' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या क्रिती सेनॉनने नुकत्याच आलेल्या 'लुका' छुपी चित्रपटातून प्रेक्षकांची मने जिंकली. या चित्रपटातील आपल्या साध्या आणि तितक्याच हसत खेळत भूमिकेने तिनं प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. ज्यानंतर क्रिती आता लवकरच 'पानिपत' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
या चित्रटातील आपल्या भूमिकेबद्दल बोलताना क्रिती म्हणते, या चित्रपटासाठी आम्ही जयपूर आणि कर्जतमध्ये चित्रीकरण केले आणि आता लवकरच मुंबईमध्ये चित्रीकरणाला सुरूवात होणार आहे. एका ऐतिहासिक चित्रपटामध्ये काम करण्याचा हा एक उत्तम अनुभव असल्याचे क्रितीने एका माध्यमाला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.
दरम्यान, हा चित्रपट 'पानिपत'च्या तिसऱ्या युद्धावर आधारीत असणार आहे. ज्यात अर्जून कपूर सदाशिवराव भाऊ यांची भूमिका साकारणार आहे. अर्जून गेल्या अनेक दिवसांपासून या भूमिकेसाठी प्रचंड मेहनत घेताना दिसत आहे. तर आशुतोष गोवारीकर या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत