मुंबई - वधूच्या वेषातील कॅटरिना कैफचा फोटो सध्या पुन्हा चर्चेत आला आहे. यात ती काहीजणींसोबत फोटोला पोज देताना दिसते. काही दिवसापूर्वी तिने फोटो आणि व्हिडिओची मालिकाच सोशल मीडियावर शेअर केली होती. खरेतर हे फोटो तिने ज्वेलरी ब्रँडसाठी केलेल्या शूटचे आहेत. कॅटरिना कैफने विकी कौशल सोबत एंगेजमेंट केल्याची चर्चा रंगत असतानाच कॅटरिनाचा एक फोटो सध्या चर्चेत आहे.
या वर्षाच्या सुरुवातीस तिने ज्वेलरी ब्रँडसाठी शूट केले होते. नुकतीच ही जाहिरात प्रसिध्द झाली. यात कॅटरिना नववधूच्या अवतारात दिसली आहे. यामध्ये कॅटरिनाचे पालक म्हणून मेगास्टार अमिताभ बच्चन आणि जया बच्चनसुद्धा दिसत आहेत. वधूच्या अवतरात कॅटरिना कैफकॅटरिनाने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये ती वधूचा पोशाख परिधान केलेली दिसत असून तिच्या ग्लॅम टीमबरोबर कार्ड्सचा आनंद घेत आहे ज्यात सेलिब्रिटी स्टायलिस्ट अनाता श्रॉफ अदजानिया आणि सनम रतान्सी, मेकअप आर्टिस्ट डॅनियल बाऊर आणि हेअरस्टाइलिस्ट यियानी त्सापातोरी यांचा समावेश आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
लग्नाच्या थीम असलेल्या कमर्शियलमध्ये रेजिना कॅसँड्रा, निधी अग्रवाल, मंजू वॉरियर आणि रेबा मोनिका जॉन देखील आहेत. रविवारी तिच्या इंस्टाग्रामवर कॅटरिना कैफने शूटमधील एक धमाकेदार फोटो शेअर केला. ज्यात सर्व सुंदर महिला सामूहिक फोटोसाठी पोज देत आहेत.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
चित्रपटाच्या आघाडीवर पुन्हा एकदा कॅटरिनाच्या सुर्यवंशीची रिलीज डेट पुन्हा पुढे ढकलण्यात आली आहे. या चित्रपटात ती अक्षय कुमारसोबत स्क्रीन शेअर करणार आहे.
हेही वाचा - कॅटरिना कैफ आणि विकी कौशलची 'एंगेजमेंट'? अफवांना ऊत