ETV Bharat / sitara

कंगनाने परिधान केले पारदर्शक ब्रालेट, ट्रोलर्सच्या टीकेला 'क्वीन'चे उत्तर

author img

By

Published : Aug 14, 2021, 5:30 PM IST

Updated : Aug 14, 2021, 8:06 PM IST

कंगना राणावत (Kangana Ranaut) 'धाकड' चित्रपटाच्या रॅप अप पार्टीतील काही फोटोत ती पांढऱ्या पारदर्शक ब्रालेटमध्ये दिसत आहे. कंगनाचे हे फोटो पाहून तिच्या सनातन धर्माबद्दल ट्रोल करण्यात येऊ लागले. त्यानंतर तिने एक प्राचीन चित्र शेअर करुन युजर्सचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला आहे.

Ancient picture shared by Kangana
कंगनाने शेअर केले प्राचीन चित्र

मुंबई - कंगना राणावतने (Kangana Ranaut) 'धाकड' चित्रपटाच्या रॅप अप पार्टीतील तिचे काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती पांढऱ्या पारदर्शक ब्रालेटमध्ये दिसत आहे. कंगनाचे हे फोटो पाहून काही युजर्स वैतागले आहेत. त्यांनी कंगनाला टोमणे मारण्यास सुरुवात केली. तिच्या सनातन धर्माबद्दल ट्रोल करण्यात येऊ लागले. त्यानंतर तिने एक प्राचीन चित्र शेअर करुन युजर्सचे तोंड बंद करण्याचा प्रयत्न केला आहे.

Ancient picture shared by Kangana
कंगनाने शेअर केले प्राचीन चित्र

कंगना रणौतने इन्स्टाग्राम स्टोरीवर प्राचीन कपडे परिधान केलेल्या एका महिलेचे चित्र शेअर केले. हे चित्र आणि कंगनाच्या फोटोत बरीच साम्य दिसतात. हे चित्र शेअर करीत तिने लिहिलंय, ''जे लोक मला सनातन धर्माचे ज्ञान देत आहेत त्यांनी कृपया लक्षात घ्या तुम्ही अब्राहमिक (Abrahamic )सारखं वागत आहात.''

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

काय म्हणाले युजर्स?

जेव्हा कंगनाचे पार्टीतील फोटो जेव्हा युजर्सच्या नजरेस पडले तेव्हा ते भडकले. एकजण म्हणाला, ''ती अनेकदा इतर स्टार्सना कपड्यांबाबत सल्ला देते आणि ती स्वतः ब्रालेटमध्ये असते.''

आणखी काही युजर्सनी कंगनाच्या विरोधात बोलायला सुरुवात केली. एकजण म्हणाला, "कंगनाने असे अपमानजनक ड्रेस परिधान करणे याची अपेक्षा नव्हती."

त्याचवेळी दुसऱ्या युजरने लिहिले - ''तुम्ही स्वतः इतरांच्या पोस्टवर कमेंट करता, तुम्ही ही पोस्ट अपलोड करताना विचार केला नाही.''

त्याचवेळी दुसऱ्या युजरने लिहिले - ''तुम्ही सनातनवर विश्वास ठेवणारी सभ्य स्त्री म्हणून तुमची प्रतिमा बनवली, तेव्हा हे सर्व काय आहे? दोन चेहरे कोणासाठीही वाईट असतात.''

आपल्या माहिती करीता सांगायचे तर कंगनाने तिच्या सोशल मीडिया अकाऊंट फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर पारदर्शक ब्रालेटमधी काही फोटो शेअर केले. या फोटोमध्ये कंगना अतिशय बोल्ड स्टाईलमध्ये दिसत आहे. कंगनाने 'धाकड' च्या रॅप अप पार्टीमध्ये हा लूक परिधान केला होता.

हेही वाचा - अमृता खानविलकरने सुरु केले स्वतःचे यूट्यूब चॅनेल!

Last Updated : Aug 14, 2021, 8:06 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.