मुंबई - ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शाह यांनी काही दिवसांपूर्वी अभिनेत्री कंगणा रानौतला 'हाफ एज्युकेटेड स्कार्लेट' म्हटले होते. त्यांच्या या वक्तव्याला कंगणाने प्रत्युत्तर दिले आहे. 'सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी स्वत: एकटी उभ्या राहिलेल्या एका हाफ एज्युकेटेड स्कार्लेटच्या मताचे कुणाला काहीही घेणे देणे नाही', असे कंगणाने एका मुलाखती दरम्यान म्हटले आहे.
-
Thank you Naseer ji, you weighed all my awards and achievements which non of my contemporaries have on the scale of nepotism,I am used to this but would you say this to me if I were Parkash Padukone/Anil Kapoor’s daughter ? 🙂 https://t.co/yA59q7Lwbf
— Kangana Ranaut (@KanganaTeam) August 18, 2020 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">Thank you Naseer ji, you weighed all my awards and achievements which non of my contemporaries have on the scale of nepotism,I am used to this but would you say this to me if I were Parkash Padukone/Anil Kapoor’s daughter ? 🙂 https://t.co/yA59q7Lwbf
— Kangana Ranaut (@KanganaTeam) August 18, 2020Thank you Naseer ji, you weighed all my awards and achievements which non of my contemporaries have on the scale of nepotism,I am used to this but would you say this to me if I were Parkash Padukone/Anil Kapoor’s daughter ? 🙂 https://t.co/yA59q7Lwbf
— Kangana Ranaut (@KanganaTeam) August 18, 2020
जर न्याय हा प्रकार अस्तित्वात असेल तर तो झालाच पाहिजे. आपण कायदा आणि न्यायव्यवस्थेवर विश्वास ठेवला पाहिजे, असेही कंगणा म्हटली.
नसीरुद्दीन शाह यांनी काही दिवसांपूर्वी सुशांतसिंह राजपूत प्रकरणी राजकीय पक्ष आणि माध्यमांच्या सहभागाबद्दल आपले मत व्यक्त केले होते. त्यांनी बॉलीवूडमधील घराणेशाहीबद्दल देखील प्रतिक्रिया दिली होती. त्यावेळी त्यांनी कंगणाबाबत उपरोधात्मक वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यानंतर कंगणाने त्यांचे आभार मानत, 'मी जर अनिल कपूर किंवा प्रकाश पदुकोण यांची मुलगी असते तर तुम्ही माझ्याबाबत असे वक्तव्य केले असते का?', असा प्रश्न शाह यांना विचारला. नसीरुद्दीन शाह एक ज्येष्ठ आणि उत्तम कलाकार आहेत. त्यांच्या सारख्या महान कलाकाराने शिव्या दिल्या तरी त्या मी प्रसाद समजते, असेही कंगणा म्हणाली.