ETV Bharat / sitara

कबीर-प्रीतीच्या लव्हस्टोरीला प्रेक्षकांची पसंती, पहिल्या दिवशी केली इतकी कमाई - kiara advani

चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरपासून ट्रेलरपर्यंत सगळ्याच गोष्टी चर्चेत राहिल्या. त्यामुळे, चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळेल, असा अंदाज वर्तवला जात होता.

कबीर-प्रीतीच्या लव्हस्टोरीला प्रेक्षकांची पसंती
author img

By

Published : Jun 22, 2019, 12:35 PM IST

Updated : Jun 22, 2019, 3:44 PM IST

मुंबई - शाहिद कपूर आणि कियारा अडवाणी यांच्या मुख्य भूमिका असलेला 'कबीर सिंग' चित्रपट शुक्रवारी प्रदर्शित झाला. चित्रपटाच्या पहिल्या पोस्टरपासून ट्रेलरपर्यंत सगळ्याच गोष्टी चर्चेत राहिल्या. त्यामुळे, चित्रपटाला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळेल, असा अंदाज वर्तवला जात होता.

हा अंदाज आता खरा ठरला आहे, असं म्हणायला हरकत नाही. कबीर सिंगची पहिल्या दिवशीची कमाई समोर आली आहे. हा सिनेमाने पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर २०.२१ कोटींची कमाई केली आहे. शनिवार आणि रविवारच्या सुट्टीचा फायदादेखील या चित्रपटाला होणार आहे. त्यामुळे, पहिल्या दिवशीपेक्षा दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशीचे आकडे जास्त असतील, असं म्हणणं वावगं ठरणार नाही.

दरम्यान हा चित्रपट पाहून सिनेमागृहाबाहेर आलेल्या बहुतेक प्रेक्षकांनी शाहिदच्या अभिनयाचं भरभरून कौतुक केलं आहे. यासोबतच कियाराचा लूक आणि संदीप रेड्डींच्या मांडणीलाही प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. आता हा चित्रपट आणखी कोणते नवे रेकॉर्ड बनवणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Intro:Body:

ENT 01

Conclusion:
Last Updated : Jun 22, 2019, 3:44 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.