ETV Bharat / sitara

वरूण-श्रद्धाच्या 'स्ट्रीट डान्सर'चं चित्रीकरण पूर्ण, शेअर केली पोस्ट - street dancer

सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान डान्स आणि काही स्टंट करताना वरूणसह श्रद्धालाही अनेकदा दुखापत झाली, त्यामुळे हा सिनेमा सतत चर्चेत राहिला. अशात आता या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं आहे. वरूण धवनने सेटवरील काही फोटो शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे.

वरूण-श्रद्धाच्या 'स्ट्रीट डान्सर'चं चित्रीकरण पूर्ण
author img

By

Published : Jul 27, 2019, 3:35 PM IST

मुंबई - वरूण धवन आणि श्रद्धा कपूर 'एबीसीडी २' चित्रपटाच्या यशानंतर आता पुन्हा एकदा स्क्रीन शेअर करण्यासाठी सज्ज झाले आहेत. लवकरच ही जोडी आणखी एका डान्सवर आधारित चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून 'स्ट्रीट डान्सर' असं या सिनेमाचं शीर्षक आहे.

सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यान डान्स आणि काही स्टंट करताना वरूणसह श्रद्धालाही अनेकदा दुखापत झाली त्यामुळे हा सिनेमा सतत चर्चेत राहिला. अशात आता या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झालं आहे. वरूण धवनने सेटवरील काही फोटो शेअर करत याबद्दलची माहिती दिली आहे.

  • Its a WRAP on #StreetDancer3D. I cant explain my emotions all I can say is I love the people involved with this film and that we are all connected. Thank you to all the teams and dancers from all over the world who have come together to make this film happen #jan24 #family pic.twitter.com/FfTDsRHVD8

    — Varun Dhawan (@Varun_dvn) July 27, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

फोटोला वरूणने कॅप्शनही दिलं आहे. या चित्रपटाबद्दलच्या माझ्या भावना मी व्यक्त करू शकत नाही. या चित्रपटात सहभागी आम्ही सगळे नेहमीच संपर्कात राहू. या चित्रपटाच्या संपूर्ण टीमचं आणि सर्व डान्सरचे मी आभार मानतो, की ते या चित्रपटासाठी एकत्र आले, असं म्हणत हा सिनेमा २४ जानेवारीला प्रदर्शित होत असल्याचं वरूणने सांगितलं आहे. प्रभूदेवाचं दिग्दर्शन असणाऱ्या या सिनेमात नोरा फतेही, अपारशक्ती खुराणा आणि शक्ती मोहन यांच्याही महत्त्वाच्या भूमिका असणार आहेत.

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.