मुंबईः सुशांतसिंह राजपूतच्या निधनानंतर बॉलिवूडमधील घराणेशाहीच्या विरोधात चाहत्यांनी अनेक मुद्दे उपस्थित केलेत. हे मुद्दे दुर्लक्षित करण्सारखे नाहीत असे मत अभिनेता मनोज बायपेयी यांनी व्यक्त केले आहे. लोकांचे प्रेम मिळवताना ते जर रागावले तर त्यांच्याकडे काना डोळा करणे योग्य नसल्याचे तो म्हणाला.
नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत जेव्हा सुशांतसिंह राजपूतच्या निधनानंतर लोक विचारत असलेल्या प्रश्नांविषयी मनोजला विचारले गेले होते. तेव्हा राष्ट्रीय पुरस्कारप्राप्त अभिनेता म्हणाला की, ''चित्रपटसृष्टीत पुष्पगुच्छ आणि दगड-विटा यांची समान भूक असणे आवश्यक आहे.''
"जर तुमच्याबद्दल राग असेल तर, मला प्रश्न विचारले पाहिजे, बरोबर? जेव्हा लोक माझा चित्रपट हिट बनवतात तेव्हा त्याच लोकांना मला प्रश्न विचारायचा अधिकार आहे, त्या प्रश्नांची उत्तरे देणे आमच्यासाठी महत्त्वाचे ठरते. काही प्रमाणात हे सरकारच्या बाबतीतही असेच घडते.'', असे मनोज म्हणाला.
"शेखर (कपूर) त्याला (सुशांत) खूप जवळून ओळखत होते, मी त्यांच्याबरोबर एका चित्रपटात काम केले होते. आम्हा सर्वांना खूपच धक्का बसला होता, हे घटलंय यावर माझा अजूनही विश्वास बसत नाही. त्याच्याशी संबंधित सर्वांना वाईट वाटले, त्याच्या कुटुंबियांच्या वेदना आपल्याला कळणार नाहीत. आपल्याला समजून घ्यावे लागेल...ते कोणत्या स्थितीतून गेले असतील याची आपल्याला जाणीव नाही,'' असेही मनोज बाजपेयी म्हणाला.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
हेही वाचा - सुशांतच्या मृत्यूबद्दल द्वेष करणाऱ्यांमुळे कोलमडलाय करण जोहर, बोलण्याचीही नाही स्थिती
सोनचिडियाच्या प्रमोशनच्यावेळी मनोज बाजपेयीने सुशांतच्या संघर्षाबद्दल सांगितले होते. आज जो संघर्ष सुशांत करतोय तसा संघर्ष वीस वर्षापूर्वी आपल्याही वाट्याला आल्याचे मनोज म्हणाला होता. यामुळे सुशांतबद्दल सहानुभूती वाटत असल्याचे त्यावेळी मनोजने सांगितले होते.
14 जून रोजी सुशांतसिंह त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरात पंख्याला लटकलेल्या अवस्थेत सापडला होता, ज्यामुळे इंडस्ट्री आणि त्याच्या चाहत्यांना मोठा धक्का बसला. गेल्या काही महिन्यांपासून तो नैराश्याने झुंज देत होता आणि त्याच्यावर उपचार सुरू होते. बॉलिवूडची विषारी संस्कृती आणि शक्तीचे असंतुलन या दोन गोष्टी त्याच्या निधनानंतर ठळकपणे समोर आल्या आहेत.