मुंबई - मला कपडे पुन्हा परिधान करण्यास कोणतीच अडचण येत नाही, असे नृत्यदिग्दर्शिका फराह खानने सांगितले आहे. फराहने सलमानसोबतचा एक जुन्हा फोटो शेअर केलाय. ज्याच्यात ती हिरव्या रंगाच्या कुर्त्यात दिसत आहे, हा फोटो बिग बॉसच्या सेटवरील आहे.
- " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
">
काही दिवसांपूर्वी इंडियाज बेस्ट डान्सरच्या सेटवर हाच ड्रेस घालून ती दिसली होती.
फोटोच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय, की मी माझे कपडे पुन्हा वापरते.
एका यूझरने लिहिलंय, "आपला हिरवा कुर्ता ट्रेंडिंग आहे." तर दुसर्या यूझरने लिहिले, "व्वा, काय छान चित्र आहे."
२०१३मध्ये फराह खानला 'बिग बॉस 8' होस्ट करण्याची संधी मिळाली होती, कारण सलमान खान त्यावेळी 'बजरंगी भाईजान'चे शूटिंग पूर्ण करीत होता.