मुंबई - ह्रतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांच्या आगामी वार चित्रपटाचा टीझर अलिकडेच रिलीज झाला. प्रेक्षकांना हा टीझर प्रचंड भावलेला दिसतो. यामुळे चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढली आहे. अशातच एक चकित करणारी बातमी मिळत आहे. बॉलिवूडचा अॅक्शन स्टार ह्रतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांनी पोर्तुगालच्या सर्वात उंच पर्वतावर शूटींग केले आहे.
-
Two heroes. One #WAR!
— Yash Raj Films (@yrf) July 15, 2019 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Presenting @iHrithik VS @iTIGERSHROFF in #WarTeaser. Whose team are you on? #HrithikVsTiger @Vaaniofficial #SiddharthAnand pic.twitter.com/pdBmfhzQCe
">Two heroes. One #WAR!
— Yash Raj Films (@yrf) July 15, 2019
Presenting @iHrithik VS @iTIGERSHROFF in #WarTeaser. Whose team are you on? #HrithikVsTiger @Vaaniofficial #SiddharthAnand pic.twitter.com/pdBmfhzQCeTwo heroes. One #WAR!
— Yash Raj Films (@yrf) July 15, 2019
Presenting @iHrithik VS @iTIGERSHROFF in #WarTeaser. Whose team are you on? #HrithikVsTiger @Vaaniofficial #SiddharthAnand pic.twitter.com/pdBmfhzQCe
पोर्तुगालच्या 'सेरा दा एस्ट्रेला' या उंच पर्वतावर टायगर आणि ह्रतिक यांनी वेगवान बाईक चालवली आहे. याचा खुलासा चित्रपटाचे दिग्दर्शक सिध्दार्थ आनंद यांनी केला आहे. ते म्हणाले, हॉलिवूडच्या मोठ्या अॅक्शनपटाप्रमाणे यातही अनेक चकित करणारे सीन्स आहेत. टायगर आणि ह्रतिक यांनी वेगात बाईक चालवण्याचे ट्रेनिंग घेतले. त्यांनी हे सीन्स तज्ञांच्या मार्गदर्शनाखाली केले. विशेष म्हणजे यातील बाईक पाठलागचा सीन पोर्तुगालच्या 'सेरा दा एस्ट्रेला' या सर्वात उंच पर्वतावर चित्रीत केला गोलाय. हा पर्वत समुद्र सपाटीपासून १९९३ मिटर उंच म्हणजेच ६५३९ फुटावर आहे.
यशराज फिल्म्सच्या वतीने बनत असलेल्या वार चित्रपटात टायगर, ह्रतिकसह वाणी कपूर मुख्य भूमिकेत आहेत. हा चित्रपट २ ऑक्टोबरला प्रदर्शित होईल. टीझरमधील अनेक दृष्यात नेत्रदीपक सीन्स पाहायला मिळत आहेत.