मुंबई - अभिनेता गुलशन देवैयाला वाटते की, सुशांतसिंहच्या निधनानंतर जो लोकांमध्ये राग आहे, तो चुकीच्या गोष्टींवर निघत आहे. गुलशनने सांगितले, ''ही विचार करण्याची वेळ आहे, आरोप करण्याची नाही. कारण इथे कित्येक प्रकारच्या षडयंत्राचे सिद्धांत आहे. लोकांच्यात जो राग आहे तो चुकीच्या गोष्टींसाठी आहे. तुम्ही जर, मला विचाराल तर राग करणे चुकीचे आहे.''
तो म्हणाला, ''आता आपल्याला शोक करण्याची गरज आहे. आपण पुढे कसे जाऊ शकतो, यावर माझ्यासारख्या अभिनेत्याने विचार करण्याची गरज आहे. आपल्यात तितके धैर्य असो वा नसो, आपल्या निराशेतून बाहेर पडलेलो असू किंवा नसू. काहीवेळा वर्षानुवर्षे आपण मेहनत करतो, पण काहीच घडत नाही. हे पूर्वीही घडलंय आणि पुढेही घडणार आहे. तुम्ही जे काही कराल, त्याला लोक जज करतील. ते तुम्हाला समोर चांगले म्हणतील आणि मागे वाईट बोलतील. तुम्ही काय कराल? मेहनत करणे सोडून देणार की, पुढे जाणार? या प्रश्नांची उत्तरे शोधायची आहेत, सुशांत कोणत्या गोष्टीमुळे गेला याची नाही.''
सुशांतसिंह १४ जून रोजी वांद्रे येथील घरी फॅनला लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. त्याने आत्महत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. तो काही महिने डिप्रेशनमध्ये होता. त्याच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमध्ये नेपोटिझ्म असल्याचा आरोप होत आहे.
हेही वाचा - सुशांत आत्महत्या प्रकरणी रियाची ९ तास चौकशी, 'या' गोष्टींचा झाला खुलासा!
गुलशन म्हणाला, ''नेपोटिझ्म हा वंशावळीनुसार आहे, ज्यातून कुंटुंबामुळे तुम्ही काही मिळवता आणि त्याचा फायदा घेता. चला, आपण पक्षपाताबद्दल बोलूयात. निर्माता आपल्या पैशांतून सिनेमा बनवतो, टॅक्स देणाऱ्या लोकांच्या नाही. त्यामुळे लोक असे म्हणू शकत नाहीत की, आम्ही पैसे दिलेत, त्यामुळे आम्ही म्हणतो तसा चित्रपट बनवा किंवा योग्यतेच्या आधारावर लोकांना घ्या. हा एक खासगी उद्योग आहे.''
तो पुढे म्हणाला, ''तुम्ही योग्यतेला मापू नाही शकत. प्रत्येकाचे आपले वेगळे मत आहे. सुशांतचे फॅन म्हणणार की, सुशांत जास्त योग्य होता. राजकुमार (राव)चे फॅन विचार करणार की तो जास्त पात्र आहे. माझे फॅन म्हणणार की, मी जास्त योग्य आहे. याला अंत नाही. लोकांनी आरोप-प्रत्यारोप करणे बंद केले पाहिजे. लोकांनी पक्षपात करणे बंद केले पाहिजे.''
अभिनेता गुलशन देवैयाने 'शैतान', 'गोलियों की रासलीला राम-लीला', 'हंटर', और 'मर्द को दर्द नहीं होता' यासारख्या चित्रपटांतून काम केले आहे.
हेही वाचा - सुशांतच्या निधनानंतर करण आणि आलियाच्या इन्स्टाग्राम फॉलोअर्समध्ये घट