ETV Bharat / sitara

अमिताभ आणि रश्मिका मंदानाच्या 'गुडबाय' चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात - रश्मिका अमिताभसोबत

एकता कपूरच्या आगामी गुडबाय या चित्रपटाचे शुटिंग सुरू झाले आहे. अमिताभ आणि रश्मिका मंदाना यात काम करणार आहे. मुहूर्ताचा शॉट पार पडल्याचा फोटो एकताना सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

Goodbye starring Big B, Rashmika Mandanna goes on floor
'गुडबाय' चित्रपटाच्या शुटिंगला सुरुवात
author img

By

Published : Apr 2, 2021, 3:17 PM IST

मुंबई - बालाजी टेलिफिल्म्स आणि रिलायन्स एंटरटेन्मेंटचा संयुक्त उपक्रम असलेल्या 'गुडबाय' या चित्रपटाचे आज शुटिंग सुरू झाले. एकता कपूरने सोशल मीडियावर महाआरती पूजेच्या फोटोंसह ही बातमी दिली.

बिग बी अमिताभसोबत दाक्षिणात्य नायिका रश्मिका मंदना यात मुख्य भूमिका साकारत आहे. 'गुडबाय' चित्रपटाचा मुहूर्ताचा शॉट काल मुंबईत पार पडला.

मिळालेल्या बातमीनुसार रश्मिकाने काल शुटिंगला सुरुवात केली. तर अमिताभ बच्चन या शुटिंगमध्ये ४ एप्रिल रोजी सहभागी होणार आहेत. विकास बहल या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार असून 'उडता पंजाब' आणि 'लुटेरा' या चित्रपटानंतर एकता आणि विकास पुन्हा एकत्र काम करीत आहेत.

तेलुगू स्टार रश्मिका मंदाना 'मिशन मजनू' या सिनेमातून हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण करणार आहे. पण त्याआधी तिने बादशाह आणि युवान शंकर राजाच्या लेटेस्ट हिट टॉप टकर या म्युझिक व्हिडिओमध्ये काम केल्यामुळे चाहत्यांना चकित केले आहे.

हेही वाचा - चैतन्यमयी टायगर श्रॉफच्या चपळता आणि फिटनेसचे रहस्य!

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.