मुंबई - अभिनेत्री गौहर खान नोव्हेंबरमध्ये तिचा कथित प्रियकर जैद दरबारसोबत लग्न करणार असल्याच्या बातमीचे खंडन केले आहे. जैद हा बॉलिवूड संगीतकार इस्माईल दरबार यांचा मुलगा आहे आणि नृत्यदिग्दर्शक आहे. गौहरने इन्स्टाग्रामवर अनेक फोटो आणि व्हिडिओंची मालिका पोस्ट केल्यापासून ही अफवा चालू आहे. या पोस्ट्स पाहता असे दिसते की या दोघांचे जवळचे नाते आहे.
मात्र, गौहर हिने बोलताना असे सर्व तर्क फेटाळून लावले आहेत. ती म्हणाली, "ही फक्त अफवा आहे. जर काही घडलं तर, मी स्वतः त्याबद्दल सांगेन."
ही अफवा एक व्हिडिओमुळे पसरली असल्याचे सांगण्यात येते. या व्हिडिओत नेहा कक्कर आणि परमिश वर्मा यांच्या 'डायमंड दा चाला' गाण्यावर गौहर आणि जैद नाचताना दिसतात. क्लिपच्या शेवटी गुडघ्यावर बसतो आणि नंतर गौहरच्या बोटांमध्ये अंगठी घालताना दिसतो. यामुळे लोकांना वाटले की, तो प्रपोज करीत आहे.
गौहर हिने पोस्टमध्ये असे लिहिले होते, "हा गाण्याचा परिणाम आहे की मन की बात... लवकर सांग."