ETV Bharat / sitara

Bollywood Actress Kajol :बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री काजोलला कोरोनाची लागण - बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री काजोल

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री काजोलला (Famous Bollywood actress Kajol) कोरोना झाला आहे. सोशल मीडियावर पोस्ट करत तिने सांगितले की, या काळात ती कोणाला सर्वात जास्त मिस करत आहे.

kajol
kajol
author img

By

Published : Jan 30, 2022, 1:52 PM IST

हैदराबाद : सध्या देशात कोरोना महामारीने थैमान घातले आहे. कोरोनाच्या विळख्याने बऱ्याच लोकांना जखडले आहे. यामध्ये सामान्य नागरिक ते राजकीय नेते आणि खेळाडू ते बॉलीवूडचे सेलिब्रीटी या क्षेत्रातील बऱ्याच लोकांना कोरोनाची लागण झाली. तसेच आता बॉलीवूडची प्रसिद्ध अभिनेत्री काजोल हिला कोरोनाची लागण (Actress kajol tested corona positive) झाली आहे. त्यामुळे काजोलच्या चाहत्यांना या बातमीने मोठा धक्का बसला आहे. त्याचबरोबर आता चाहते तिच्या आरोग्यासाठी सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रार्थना करत आहेत.

बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री काजोलची इंस्टाग्राम पोस्ट

अभिनेत्री काजोल आपली मुलगी न्यासाला मिस करत (Kajol misses her daughter Nyasa) असल्याची एक पोस्ट आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केली आहे. काजोलने ही पोस्ट रविवारी शेअर केली आहे. पोस्ट शेअर करताना आपली मुलगी न्यासाचा फोटो जोडत काजोलने लिहिले की, मला कोरोना झाला आहे आणि माझे रुडॉल्फ नाक कुणालाही दिसावे असे मला वाटत नाही, यासाठी जगातील सर्वात गोंडस स्माईल (न्यासाचे हसणे), न्यासा देवगण तुला खूप मिस करत आहे.

त्याच वेळी, काजोलचे चाहते तिला धीर देत आहेत आणि ती लवकर बरी होण्यासाठी शुभेच्छा देत आहेत. अभिनेत्री प्रियांका चोप्रानेही काजोलच्या मुलीचे कौतुक करत काजोलसाठी प्रार्थना (Actress Priyanka Chopra prays for Kajol) केली आहे. काजोलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर ती शेवटची त्रिभंग चित्रपटात दिसली होती. हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.