हैदराबाद (तेलंगणा): पुष्पाच्या (Pushpa The Rise ) यशानंतर, अल्लू अर्जुनचा दुसरा जबरदस्त हिट चित्रपट 'अला वैकुंठापुरमुलू'ची हिंदी आवृत्ती ( Hindi version of Ala Vaikunthapurmulu ) प्रजासत्ताक दिनानिमित्त थिएटरमध्ये रिलीज होण्यासाठी सज्ज आहे. 'अला वैकुंठपुररामुलू'चा हिंदी रिमेक तयार होत असल्याने व्यापारी वर्तुळासाठी ही घोषणा धक्कादायक ठरली.
अल्लू अर्जुनचा 'पुष्पा: द राइज' ( Pushpa The Rise ) डिसेंबरमध्ये रिलीज झाला आणि 'स्पायडर-मॅन: नो वे होम' आणि क्रिकेट ड्रामा '83' सारख्या चित्रपटांच्या स्पर्धेला जबरदस्त फाईट दिली. पुष्पा या सिनेमाच्या हिंदी आवृत्तीने बॉक्स ऑफिसवर तब्बल ८० कोटींहून अधिक कमाई केली आहे. पुष्पाच्या यशाने गोल्डमाइन्स टेलिफिल्म्सचे मनीष शाह यांच्याकडे 'अला वैकुंठपुररामुलू'चे डबिंग अधिकार आहेत. त्यांनी 26 जानेवारी रोजी देशभरातील सुमारे 2000 स्क्रीन्सवर 'अला वैकुंठपुररामुलू' चित्रपटाची हिंदी आवृत्ती प्रदर्शित करण्याचे ठरवले आहे.
कथेतील ट्विस्ट असा आहे की चित्रपट निर्माते भूषण कुमार, अल्लू अरविंद आणि अमन गिल यांनी 'शेहजादा' ( Shehzada ) हा 'अला वैकुंठापूररामुलू'चा हिंदी रिमेक गेल्या वर्षी फ्लोअरवर घेतला आहे. कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनन यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट रोहित धवन दिग्दर्शित करत आहे. अल्लू अर्जुनच्या 'पुष्पा: द राइज'च्या उत्तुंग यशानंतर, 'अला वैकुंठापूररामुलू'च्या हिंदी डब केलेल्या आवृत्तीला चांगला प्रतिसाद मिळू शकतो आणि त्यामुळे कार्तिकच्या 'शेहजादा'बद्दलचा उत्साह कमी होऊ शकतो. कार्तिक आणि शेहजादाच्या निर्मात्यांनी 'अला वैकुंठापूररामुलू'च्या हिंदी रिलीजवर अद्याप प्रतिक्रिया दिलेली नाही. मात्र या चित्रपटात महत्त्वाची भूमिका साकारणारे ज्येष्ठ अभिनेते परेश रावल यांना या घडामोडीमुळे धक्का बसला आहे. भविष्यात अशी अप्रिय परिस्थिती टाळण्यासाठी चित्रपट निर्मात्यांना अधिक सावध राहावे लागेल. जेव्हा दक्षिणेकडील चित्रपटांचा रिमेक करण्याचा विचार येतो तेव्हा निर्मात्यांनी त्यांच्या चित्रपटांना सुरक्षित ठेवण्यासाठी डबिंगचे अधिकार देखील विकत घेतले पाहिजेत.
हेही वाचा - Dhanush Aishwaryaa split : RGV म्हणतो 'हुशार लोक प्रेम करतात आणि ढ लग्न'