ETV Bharat / sitara

गर्भधारणेचा परिणाम म्हणून आम्ही लग्न केले नाही, दीया मिर्झाचे ट्रोलरला सडेतोड उत्तर

दीया मिर्झाने वयस्क महिला पुजारीला लग्नाच्या विधीसाठी बोलावून पारंपरिक रुढीला छेद देत विवाह केला होता. अलिकडेच तिने आई होणार असल्याची घोषणा केल्यानंतर तिच्यावर टीका होत आहे. याला दीयाने नम्रपणे आणि तितकेच सडेतोड उत्तर दिले आहे.

Dia Mirza replies to troll,
दीया मिर्झाचे ट्रोलरला सडेतोड उत्तर
author img

By

Published : Apr 6, 2021, 7:08 PM IST

मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झावर अलिकडे ट्रोलर्सनी जोरदार हल्ला केला होता. जुन्या रुढी तिला मोडायच्या होत्या तर लग्नाअगोदर तिने आपली प्रेग्नन्सी का लपवली होती, असा प्रश्न तिला ट्रोलर्सनी विचारला होता. याला दीयाने नम्रपणे आणि तितकेच सडेतोड उत्तर दिले आहे.

मुंबईत फेब्रुवारीमध्ये दीया मिर्झा हिने व्यावसायिक वैभव रेखी यांच्यासोबत विवाह केल्यानंतर तिने आता आपण आई होणार असल्याचे जाहीर केले होते. फिल्म इंडस्ट्रीतील तिचे सहकारी आणि इतरांनी तिला शुभेच्छा दिल्या असल्या तरी सोशल मीडियावर टीका करणारे काही संदेशही आले आहेत.

दीयाने प्रेग्नन्सीच्या घोषणा केल्यानंतर पूजा चांडक नावाच्या एका युजरने इन्स्टाग्रामवर कॉमेंट केली आहे. दीयाच्या पोस्टवर प्रतिक्रिया व्यक्त करताना तिने लिहिले, "ते खूप चांगले आहे, अभिनंदन. पण प्रश्न असा आहे की महिला पुजारीकडून लग्नाचे विधी करुन तू रुढींना छेद दिला, मग तू लग्ना अगोदर गर्भवती असल्याचे का जाहीर केले नाही? आम्ही ज्याला रुढी म्हणतो त्यात लग्नानंतर गर्भवती असल्याचे जाहीर करणे नाही का? लग्नआधी महिला गर्भवती होऊ शकत नाही का?"

Dia Mirza replies to troll,
दीया मिर्झाचे ट्रोलरला सडेतोड उत्तर

माजी ब्यूटी क्विन असलेल्या दीया मिर्झाने या प्रश्नाचे उत्तर देताना लिहिले, ''पूजा चांडक, तुझा प्रश्न रंजक आहे. पहिली गोष्टी म्हणजे आम्हाला मुल हवे होते म्हणून लग्न केले नाही तर आम्हाला एकत्र आयुष्य घालवायचे होते म्हणून लग्न केले. आम्ही जेव्हा लग्नाचे नियोजन करीत होतो तेव्हा आम्हाला मुल होणार असल्याचे कळले. त्यामुळे गर्भधारणेचा परिणाम म्हणून आम्ही लग्न केले नाही. आम्ही गर्भधारणा झाल्याची घोषणा केली नाही कारण आम्हाला ही गर्भधारणा सुरक्षित असल्याचे जाणून घ्यायचे होते (वैद्यकीय कारणे). ही माझ्या आयुष्यातली आनंदाची बातमी आहे. यासाठी मी अनेक वर्षांची प्रतीक्षा केली आहे. वैद्यकीय कारणांशिवाय ही बातमी लपवण्याचा माझ्याकडे दुसरा कोणताच मार्ग नव्हता.''

त्यानंतर दीया मिर्झाने या गोष्टीचे स्पष्टीकरण का द्यावे लागले याबद्दलही सांगितले. ''फक्त उत्तरे देत आहे कारण १) मुल असणे हे आयुष्याचे सर्वात सुंदर गिफ्ट असते. २) या सुंदर प्रवासात कधीही कोणतीही लाज वाटू नये ३) एक महिला म्हणून आपली आवड जपण्याचा नेहमीच प्रयत्न केला पाहिजे. ४) आपण अविवाहित राहून पालक व्हायचे किंवा लग्न करुन ही सर्वस्वी तुमची निवड असते. ५) एक समाज म्हणून आपण काय योग्य किंवा अयोग्य आहे याची आपली कल्पना रुढीपूर्वक बदलली पाहिजे, त्याऐवजी काय योग्य किंवा अयोग्य आहे हे विचारण्यास स्वतःला प्रशिक्षित केले पाहिजे. "

दीया मिर्झाने १५ फेब्रुवारी २०२१ रोजी वैभवशी लग्न केले होते. नुकतीच तिचा नवरा आणि सावत्र मुलगी मालदीव येथे सुट्टीवर गेली होती. दीयाचे हे दुसरे लग्न आहे. यापूर्वी तिचे लग्न साहिल संघाशी झाले होते, ती तिची बिझिनेस पार्टनर देखील होती.

हेही वाचा - सोनाली कुलकर्णी करणार ‘क्राइम पॅट्रोल सतर्क: जस्टिस रिलोडेड’चे सूत्रसंचालन!

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.